शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Election 2022: भाजपला मत देण्यासाठी रेल्वेचे मोफत तिकीट; स्वयंसेवी संस्थांनी दिली ॲाफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 07:22 IST

अनिवासी भारतीय आणि संस्था महाराष्ट्र आणि गुजरातमधून उत्तर प्रदेशच्या मतदारांना  मतदानासाठी आणण्यासाठी रेल्वे आणि बसची तिकिटे पाठवित आहेत, असेही वशिष्ट म्हणाले.

शरद गुप्तानवी दिल्ली : रोजीरोटीसाठी उत्तर प्रदेशातील महाराष्ट्रात वास्तव्यास असले, तरी ते तिकडचे मतदारही आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत हिंदू राष्ट्रासाठी भाजपला मतदान करण्यासाठी त्यांना रेल्वेचे मोफत तिकीट  दिले जात आहे. जनसंख्या समाधान फाउंडेशन या संस्थेने एक व्हॉट्सॲप नंबर (९२११००१५००) जारी केला आहे. त्यावर इच्छुकांनी नाव, वय, लिंग, पत्ता आणि तेथील ठिकाण याची माहिती पाठविल्यास त्यांना  दोन्ही बाजूने (जाणे-येणे) रेल्वे प्रवासासाठी  व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मोफत तिकीट मिळेल.

संकल्प करूनही एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या  पक्षाला मतदान दिले तर? यावर वशिष्ट यांनी सांगितले की, त्याचा प्रामाणिकपणा आणि सद्सद्विवेक स्पष्ट होतो.  आम्ही चांगल्या कामासाठी प्रति व्यक्ती ४०० रुपये खर्च करीत आहोत. बरेचसे पक्ष मतांसाठी दारू, पैसे आणि साड्याही वाटतात. आम्ही फक्त रेल्वेचे तिकीट देतो.  तेही पवित्र कामासाठीच. आमची संस्थाच नव्हें, तर भाजपचे समर्थक असलेले अनेक अनिवासी भारतीय आणि संस्था महाराष्ट्र आणि गुजरातमधून उत्तर प्रदेशच्या मतदारांना  मतदानासाठी आणण्यासाठी रेल्वे आणि बसची तिकिटे पाठवित आहेत, असेही वशिष्ट म्हणाले.

तिकीट कधी मिळते?

या संस्थेचे कर्ते-धर्ते अजय वशिष्ट यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रत्येक इच्छुक व्यक्तीकडून आम्ही व्हॉट्सॲपवर एका व्हिडिओ मागवतो. त्यात संबंधित व्यक्ती नाव आणि पत्त्यासह ओळख  देत भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी योगदान म्हणून भाजपला मतदान करण्याचा संकल्प करते. त्याला एका तासातच त्या ठिकाणचे दोन्ही बाजूने प्रवासाचे (कन्फर्म) तिकीट मिळते. यासाठी मी पदरखर्च करीत नाही. देश-विदेशातील अनेक लोक मला आर्थिक सहकार्य करीत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातव्यतिरिक्त दिल्ली व पंजाबमधून उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाण्यासाठी आम्ही ५० तिकिटे पाठविली आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेBJPभाजपाElectionनिवडणूक