शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

"योगीजी यांना सोडू नका!’’, आई आणि बहिणींची हत्या करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:13 IST

Uttar Pradesh Crime News: चार बहिणी आणि आईची हत्या करणारा आरोपी अरशद याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामधून त्याने धक्कादायक दावे केले आहेत. अरशद याने या घटनेसाठी आपल्या वस्तीतील लोकांना जबाबदार धरले आहे. तसेच त्याने काही आरोपींची नावंही घेतली आहेत.

नववर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील एका हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील पाच महिलांची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ४ बहिणी आणि आई अशा पाच जणांची हत्या करणारा आरोपी मोहम्मद अरशद याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी अरशद याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामधून त्याने धक्कादायक दावे केले आहेत. अरशद याने या घटनेसाठी आपल्या वस्तीतील लोकांना जबाबदार धरले आहे. तसेच त्याने काही आरोपींची नावंही घेतली आहेत.

या व्हिडीओमध्ये आरोपी मोहम्मद अरशद म्हणतो की, माझं नाव मोहम्मद अरशद आहे. आज आमच्या वस्तीमधील लोकांमुळे आणि त्यांच्यासोबतच्या वादामुळे थकूर हरून मी आज हे पाऊल उचललं आहे. आज मी माझ्या बहिणी आणि आईची हत्या केली. जेव्हा पोलिसांना हा व्हिडीओ मिळेल, तेव्हा त्यांनी यासाठी आमच्या वस्तीमधील लोक जबाबदार आहेत हे जाणून घ्यावे. त्यांनी आमचं घर हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आम्हाला खूप त्रास दिला. आम्ही त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण आमचं कुणी ऐकून घेतलं नाही.  त्यामुळे मागच्या दहा-पंधरा दिवसांपासून नाईलाजास्तव आम्हाला फुटपाथवर झोपावं लागत आहे. थंडीत भटकावं लागत आहे.

आमचं राहतं घर त्यांनी हिसकावून घेतलं आहे. घराची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ती आम्हाला मंदिराच्या नावावर करायची होती. त्याशिवाय आम्हाला धर्म बदलायचा होता. त्यामुळे सर्व कागदपत्रे आम्ही आमच्याकडे ठेवली आहेत. पोलिसांना हा व्हिडीओ मिळाल्यावर लखनौ पोलीस आणि योगी यांना एक विनंती आहे की, यांच्यासारख्या मुस्लिमांना सोडू नका. तुम्ही जे काही करत आहात, ते खूप चांगलं आहे. हे लोक जागोजागी जमिनीवर कब्जा करत आहेत. तसेच लोकांवर जुलूम करत आहेत. हे अनेक बेकायदेशीर गुन्ह्यांमध्ये गुंतले आहेत. तसेच बनावट नोटांचा धंदा करत आहेत, असा आरोपही त्याने केला. 

आम्ही खूप दिवसांपासून या सर्वांविरोधात कारवाई करण्याचा खूप प्रयत्न केला. आमच्या मृत्यूसाठी संपूर्ण वस्ती जबाबदार आहे. त्यामधील मुख्य आरोपी रानू उर्फ आफताब अहमद, अलीम खान, सलीम ड्रायव्हर, अहमद, आरिफ, अझहर आणि त्यांचे नातेवाईक आहेत, असा आरोप आरोपी अरशद याने केला. 

हे लोक खूप मोठी भूमाफिया गँग चालवतात. यामध्ये ते मुलींची विक्री करतात. आम्हाला कुठल्यातरी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून आमच्या बहिणींची हैदराबादमध्ये विक्री करण्याची यांची योजना होती. आमच्या घरासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीच्या माध्यमातून माझ्या बहिणींची विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आम्हाला हे होवू द्यायचे नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव मी माझ्या बहिणींचा गळा आवळून आणि हातांच्या नसा कापून मारले, अशी कबुलीही त्याने या व्हिडीओत दिली आहे. दरम्यान, अरशदला पोलिसांनी घटनास्थळावरूनच पकडले आहे. तर आरोपी वडील फरार आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस