उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे स्वत:ला पेटवून घेतलेल्या स्थितीत एक पती रस्त्यावर सैरावैरा पळताना दिसला. त्याला त्या अवस्थेत पाहून रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर संतापलेल्या या पतीने स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. तसेच जेव्हा आगीमुळे शरीर भाजू लागलं तेव्हा तो रस्त्यावरून ओरडत पळू लागला. जवळपास ५०० मीटर पळाल्यानंतप तो खाली पडला. आजूबाजूच्या लोकांनी येऊन आग विझवेपर्यंत या तरुणाचा मृत्यू झाला होता.
ही धक्कादायक घटना बरेलीमधील कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील सकलेननगरमध्ये राहणारा ४० वर्षीय समील हा भंगाराच्या व्यवसाय करायचा. रविवारी कुठल्या तरी कारणावरून त्याचं पत्नी नजमीनसोबत भांडण झालं. त्यानंतर सलीम याने स्वत:वर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले.
हा प्रकार पाहून पत्नी घाबरली. तर सलीम इकडे तिकडे पळू लागला. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यंत सलीमचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पाठवला.