शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:00 IST

Uttar Pradesh Crime: वडिलांनी स्वतःच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Uttar Pradesh Crime: कानपूर जिल्ह्यातील बिधनू परिसरात अंधश्रद्धा आणि तांत्रिक विधीच्या नावाखाली एका बापाने स्वतःच्या आठ वर्षांच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी ओरडल्यामुळे आसपासच्या लोकांनी तत्काळ धाव घेतली आणि मुलीचा जीव वाचवला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपी बापाला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.

कालव्याशेजारी घडली घटना

ही घटना रामगंगा कालव्याच्या शेजारी घडली असून हे ठिकाण बिधनू पोलीस ठाण्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर आहे. औंधा गावातील सौरभ सैनी हा आपल्या भावासोबत नवीन घर बांधत होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार सौरभ दीर्घकाळापासून मानसिक आजाराने त्रस्त असून, तो तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेच्या आहारी गेला आहे.

घर बांधकामाऐवजी मेकअप आणि साड्यांवर खर्च

सौरभचा भाऊ राहुल सैनी याने सांगितले की, घर बांधकामासाठी सौरभला 80 हजार रुपये दिले होते. मात्र, त्याने बांधकाम न करता ट्रॉली बॅग, झुला, मुलीसाठी नवीन कपडे, महागड्या साड्या आणि मेकअप साहित्य खरेदी केले. शनिवारी सौरभने नवीन साडी घातली आणि मुलगी वैष्णवीला नवीन कपडे घालून कालव्याच्या शेजारी घेऊन गेला. त्या वेळी तिथे इतर कोणीही नव्हते.

मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न

सौरभने आपल्या पोटच्या मुलीचा अचानक गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या किंकाळ्या ऐकून कालव्याच्या दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या लोकांनी तत्काळ कालव्यात उडी मारली आणि मुलीची सुटका केली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून जोरदार चोप दिला. 

आरोपीचा विचित्र दावा

पोलिस चौकशीत सौरभने मुलीला मारण्याचा आरोप नाकारला आणि “माझ्या किन्नर वडिलांच्या आत्म्याने मला हे करण्यास सांगितले” असा विचित्र दावा केला. कुटुंबीयांनी सांगितले की, त्याचे वडील महिलांच्या वेशात फुले विकायचे. त्यांच्या मृत्यूनंतर सौरभच्या वागण्यात अचानक बदल झाला. पत्नी सात वर्षांपूर्वी घर सोडून गेल्यानंतर तो अंधश्रद्धेत अधिक गुंतला.

मुलगी चुलत्याकडे, आरोपी पोलिस ताब्यात

घटनेनंतर पोलिसांनी मुलीला तिचे चुलते राहुल सैनी आणि चुलती लक्ष्मी यांच्या ताब्यात दिले आहे. तर, आरोपी सौरभला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. तांत्रिक विधी किंवा बळीचा पुरावा मिळाल्यास आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच त्याची मानसिक तपासणीही करण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Father Attempts to Sacrifice Daughter in Superstition; Locals Intervene.

Web Summary : In Kanpur, a father tried sacrificing his daughter under superstition. Locals rescued her and beat the father. He claimed a spirit told him to do it. The girl is safe with relatives; the father is in custody, facing investigation.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी