शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश : गप्पांच्या ओघात नर्सनं पाच मिनिटांत एकाच व्यक्तीला दिले कोरोना लसीचे दोन डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 14:37 IST

Coronavirus Vaccine UP : पाच मिनिटांच्या अंतरानं एकाच व्यक्तीला लसीचे दोन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर. लसीकरण केंद्रात उडाला एकच गोंधळ. पाहा काय म्हटलंय आरोग्य कर्मचाऱ्यांनी.

ठळक मुद्देपाच मिनिटांच्या अंतरानं एकाच व्यक्तीला लसीचे दोन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर. लसीकरण केंद्रात उडाला एकच गोंधळ.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु उत्तर प्रदेशातील ललितपुर जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या केंद्रात लसीकरण करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला गप्पांच्या ओघात एका नर्सनं लसीचे दोन डोस पाच मिनिटांच्या अंतरानं दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोग्य विभाग आणि लसीकरण केंद्रात एकच गोंधळ उडाला. तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे वृत्त बनावट असल्याचं म्हटलं आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला लसीचे किती डोस आणि किती प्रमाणात द्यायचे हे निश्चित करण्यात आलं आहे. याशिवाय दोन डोसमध्ये किती अंतर असावं हेदेखील ठरवण्यात आलं आहे. लसीकरण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ३० मिनिटे बसावंही लागतं.घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी घराशेजारी लस देणे शक्य, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

बुधवारी दुपारी शहरातील बडामपुरा येथील कृष्णमुरारी यांनी रावर इंटर कॉलेजमधील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी पोहोचले. त्या ठिकाणी त्यांचं कार्डही तयार करण्यात आलं आणि त्यांना लसीचा डोस देण्यात आला. परंतु यानंतर त्यांनी नर्सनं आपल्याला लसीचे दोन डोस दिल्याचा आरोप केला. आपण जेव्हा लसीकरण केंद्रावर गेलो तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या नर्स एकमेकांशी गप्पा मारत होत्या. त्याचवेळी त्यांनी आपल्याला पाच मिनिटांच्या अंतरानं लसीचे दोन डोस दिल्याचा आरोप संबंधित व्यक्तीनं केला. या प्रकरणाची माहीती मिळताच आरोग्य विभागाच्या पायाखालचीही जमीन सरकली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेण्यात आलं. यानंतर त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. दरम्यान, आता त्यांची प्रकृती ठीक आहे. डोस कमी सापडले नाहीत

केंद्रावर लाभार्थी आल्यानंतर त्यांना कार्ड देण्यात आलं आणि त्यांचं लसीकरण करण्यात आलं. लाभार्थी तासभर त्याच ठिकाणी थांबले होते. त्यानंतर ते आपल्या घरी गेले. एका तासानंतर ते पुन्हा आले आणि आपल्याला दोन डोस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर लसीचे डोस तपासण्यात आले. परंतु त्यात कमी डोस सापडले नाहीत, अशी माहिती नोडल अधिकारी, लसीकरण केंद्र के.एस. सिंह यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश