योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:20 IST2023-02-23T15:20:03+5:302023-02-23T15:20:48+5:30

नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील. न भूतो असा विजय भाजपला मिळणार आहे, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

uttar pradesh cm yogi adityanath praised goa chief minister pramod sawant | योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक

योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

लखनऊ भेटीवर असलेल्या गोव्यातील पत्रकारांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशाची माहिती देताना योगी यांनी गोव्याची वाटचाल ही योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, गोवा पर्यटन राज्य आहे. गोव्याच्या समस्या वेगळे आहेत आणि आव्हाने वेगळी आहे तसेच उत्तर प्रदेशचे विषय वेगळे आहेत. डॉक्टर सावंत हे गोव्याला कुशल नेतृत्व देत आहेत.

उत्तर प्रदेश राज्यातून गुन्हेगारी संपविण्याचे काम भाजप सरकारच्या काळात झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व क्षेत्रात राज्याने प्रगती केल्याचे ते म्हणाले. चार पदरी महामार्ग, रोजगार निर्मिती, भूकमारी पासून मुक्त करणे, तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील चांगली कामगिरी केल्याचे आकडेवारीसह योगी यांनी सांगितले.

लोकसभेच्या पुन्हा निवडणुका झाल्यास नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील. उत्तर प्रदेश मधून न भूतो असा विजय भाजपला मिळणार आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: uttar pradesh cm yogi adityanath praised goa chief minister pramod sawant