शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

वीज कर्मचाऱ्याला दंड ठोठावणं पोलिसांना महागात; पोलीस ठाण्याचंच कनेक्शन कापून टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 19:04 IST

उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. यूपी पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (UPPCL) लाइनमनचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दुचाकीवरुन जाताना यूपी पोलिसांनी अडवलं आणि त्याला दंड ठोठावला.

उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. यूपी पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (UPPCL) लाइनमनचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दुचाकीवरुन जाताना यूपी पोलिसांनी अडवलं आणि त्याला दंड ठोठावला. हा प्रकार लाइनमनच्या सहकाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी थेट पोलीस ठाण्याची वीजच कापून टाकली. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याशी निगडीत सुमारे १२ बेकायदेशीर वीज कनेक्शन कापण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे एका वीज कर्मचाऱ्यावर कारवाई केल्यामुळे पोलीस ठाणं अंधारात गेल्याची वेळ उत्तर प्रदेश पोलिसांवर आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटना सोमवार 28 मार्चची आहे. कुंवरगाव वीज उपकेंद्राचा लाइनमन अजय हा काली गावात वीज कनेक्शन जोडण्यासाठी गेला होता. लाइन जोडून अजय दुपारी दुचाकीवर परत येत होता. त्याच्याकडे हेल्मेट नव्हतं. काझी गावाच्या वळणावर कुंवरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामनरेश वाहनांची तपासणी करत होते. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याबद्दल त्यांनी अजयला थांबवलं. आपण पॉवर कॉर्पोरेशनचा लाईनमन असून तो कुंवरगाव पॉवर सबस्टेशनच्या ड्युटीवर असल्याचं अजयनं इन्स्पेक्टरला सांगितलं. पण निरीक्षकांनी त्याचं ऐकलं नाही आणि हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याबद्दल त्याचं ऑनलाइन चलान कापलं. वीज उपकेंद्रावर पोहोचल्यानंतर अजयनं त्याचे वरीष्ठ अधिकारी जेई सतीश चंद्रासह त्यांच्या उर्वरित सहकाऱ्यांना याबाबत सांगितलं. अजयला दंड ठोठावण्यात आल्यानं विद्युत विभागाचे कर्मचारी संतप्त झाले, सर्वांनी कुंवरगाव पोलीस ठाण्यातील वीज कनेक्शन तपासलं असता पोलीस ठाण्यात सुमारे डझनभर अवैध कनेक्शन असल्याचं आढळून आलं. मग काय, वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून पोलीस ठाण्याचे सर्व अवैध कनेक्शन तोडले. एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांनी लाईन कापण्यापूर्वी व लाईन कापताना व्हिडिओ बनवून या सर्व व्हिडिओ क्लिप वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.

काय म्हणाले अधिकारी?"निरीक्षक आणि लाइनमनमध्ये नेमकं काय झालं याची माहिती नाही, मात्र उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला लाइन आणि कनेक्शन कापल्याचं व्हिडिओ पाठवले आहेत", असं या प्रकरणी कुंवरगावचे एसडीओ विपीन मौर्य यांनी सांगितलं. "पोलीस ठाण्यात फक्त एक कनेक्शन वैध होतं जे खंडित करण्यात आलेलं नाही  इतर सर्व बेकायदेशीरपणे सुरू असलेली कनेक्शन तोडण्यात आली आहेत", अशी माहिती एसडीओ विपिन मौर्य यांनी दिली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी