शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Uttar Pradesh Assembly Election Results 2022: यूपीत शिवसेनेची अत्यंत दयनीय अवस्था; ३२ उमेदवारांना मिळालेली मतं तरी पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:51 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२: उत्तर प्रदेश निवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक मतदारसंघात शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाल्याचं दिसून आलं.

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील १९ जणांचा उमेदवार अर्ज बाद झाला. त्यामुळे ४१ ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला किती मतदान झालं? याची उत्सुकता सगळ्यांना आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात छाप पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. यूपी, गोवासारख्य राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी प्रचार केले.

उत्तर प्रदेश निवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक मतदारसंघात शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाल्याचं दिसून आलं. याठिकाणी नागरिकांनी शिवसेनेला नाकारलं आहे. जाणून घेऊया शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेली मतं

उमेदवाराचं नावविधानसभा मतदारसंघपडलेली मतेNOTA ला मिळालेली मते
सीमा देवीजमानिया ११२५१४
सुशील कुमार विश्वनाथगंज१९८६७२
राकेश कुमारसिराथु८५२०८
अमित सिंह तोमरसिकंदराबाद१०४६२६
शिवप्रकाश कौशलसिंकरदाराऊ ६३४५८
झाहीद संभल९७५६४
प्रल्हाद सिंहसहजनवा११३४८१
सुरेंद्र सिंह रामपूर खास२८४१५३२
सुभाष चंद्राराम नगर२८६८६३
घनश्याम प्रतापपूर९८२५१
माधवेंद्र प्रताप मुंगरा बादशाहपूर १५१४१ 
विपीन भटनागरमुरादाबाद नगर१३०५२९
दिपक सिरोहीमेरठ कैंट४० ३०९ 
मीना कुमारीमऊरानीपूर४३११७५२
राज कुमारमंत २८५४५२
गौरव वर्मा लखनौ मध्य९३४८५
विपीन कुमारकुंदरकी२६२१४४२
आरती देवीकोराव१०१९१२५८
पवन कुमार तिवारीकिदवई नगर३९ ३१८
शैलू कश्यपखतौली३४६४२१
शशी दुबेजौनपूर४०९४
देवेंद्र सिंहहथरस१२९५८७
विजय प्रकाशगौरा३२५७५५
शैलेंद्र उर्फ राजू श्रीवास्तवडुमरियागंज१८२८६२२
मुलंदर कुमार अवस्थीधौरहरा२२२९२१७३
हेमंत शर्मा दादरी२२७१२९८
निर्मला गुप्ता दादरूल२२८६३२
राज परिक्षित सिंहबाराबंकी२६४८५२
रिंकु सहानीबलहा४८३१८१८
राजवंत सिंहबहराइच१५७६२८
शिरोमण सिंह राजपूतबबीना३६३१२४०
रश्मी अनुपशहर१६२७०८
    

१९९१ पासून शिवसेना यूपीत निवडणूक लढतेय, पण...

आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिमी यूपीतील काही जिल्ह्यात प्रचार दौरे केले होते. धनुष्यबाण चिन्ह असलेल्या शिवसेनेने सुरुवातीपासून यूपी निवडणुकीत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याबाबतही शिवसेनेची चर्चा झाली. परंतु त्यानंतर शिवसेना स्वबळावर निवडणुकीत उभी राहिली. १९९१ पासून शिवसेना उत्तर प्रदेशात निवडणूक लढतेय. केवळ एकदा पवनकुमार पांडेय हे आमदार म्हणून निवडून आले. यूपीत स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. २०१९ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात राम मंदिरात दर्शन घेतले होते. तेव्हापासून यूपीत शिवसेनेने वातावरण निर्मिती केली होती.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Shiv Senaशिवसेना