शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : भाजपाच्या विजयाचा औवेसींनी काढला लोकांवर राग; म्हणाले, "चूक EVM ची नव्हे तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 08:12 IST

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा जनतेनं भाजपलाच संधी दिलीये. २७१ जागांवर विजय मिळवत भाजपनं आपली सत्ता कायम राखली आहे.

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : पाच राज्यांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पंजाब वगळता सर्वच राज्यांमध्ये (Punjab Assembly Election Results) भाजपला यश मिळालं आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा जनतेनं भाजपलाच संधी दिलीये. २७१ जागांवर विजय मिळवत भाजपनं आपली सत्ता कायम राखली आहे. दरम्यान, भाजपला मिळालेल्या विजयानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला सत्ता देण्याच्या निर्णयाचा आपण सन्मान करतो, असं ते म्हणाले. परंतु यावेळी त्यानी लोकांवर संतापही व्यक्त केला.

"उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला सत्ता देण्याचा निर्णय घेतला. मी जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. मी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकर्ते, सदस्य आणि जनतेला धन्यवाद देतो, ज्यांनी आम्हाला मत दिलं. आम्ही खुप प्रयत्न केला. परंतु निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. आम्ही पुन्हा एकदा चांगली मेहनत करू," असं ओवैसी म्हणाले.

"सर्वच राजकीय पक्ष ईव्हीएमचा मुद्दा घेऊन आपला पराभव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ही ईव्हीएमची चूक नाही, लोकांच्या डोक्यात जी चिप टाकलीये त्याची आहे. आम्हाला यश मिळालं, परंतु ते ८०-२० असं आहे. आम्ही पुन्हा जोमानं कामाला लागू आणि पुढील वेळी आम्ही चांगली कामगिरी करू," असंही ते म्हणाले. 

व्होट बँक म्हणून वापर"उत्तर प्रदेशातील अल्पसंख्यांकाचा केवळ व्होटबँक म्हणून वापर केला आहे. लखीमपूर खीरीमध्येही भाजपचा विजय झाला. म्हणूनच मी म्हणतो की हा ८०-२० चा विजय आहे. ही ८०-२० ची स्थिती वर्षांपर्यंत काय राहील आणि हे लोकांना समजण्याची गरज आहे. आमचा उत्साह कायम आहे," असंही ओवेसी यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन