शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत, कॉम्प्रेसर थोडेच आहेत, जे थंड करतील", अखिलेश यादवांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:37 IST

UP Assembly Elections 2022 : अमृत अर्थसंकल्प असेल तर त्याआधी सगळे विषारी अर्थसंकल्प होते का? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. 

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे (UP Assembly Elections) वातावरण चांगलेच तापले आहे. समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनी बुलंदशहरमध्ये आघाडीचा प्रचार केला. संयुक्त पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या 10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू, या विधानावरून त्यांच्यावर निशाणा साधला. 

'योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत, कॉम्प्रेसर थोडेच आहेत, जे थंड करतील', असे म्हणत अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, अखिलेश यादव म्हणाले की, प्रत्यक्षात भाजपाचा पराभव पाहून धक्का बसला आहे. याचबरोबर, बुलंदशहर घटना आणि हाथरसची घटना सरकारचे अपयश दर्शवते. तेथे कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मुलीचे अंतिम संस्कार करण्याची संधी दिली गेली नाही. बुलंदशहर घटनेतील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. याचे उत्तर सरकारने द्यावे, असे अखिलेश यादव म्हणाले. 

अखिलेश यादव यांनी बुलंदशहरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यात समाजवादी पार्टीचे सरकार आल्यास उत्तर प्रदेशात नोकरभरती सुरू केली जाईल. केंद्रीय अर्थसंकल्पातही आपली फसवणूक झाल्याचे आज देशातील शेतकरी दु:खी आहेत. कोणता अर्थसंकल्प आला आहे, हे गरिबांना कळतही नाही. सरकार याला अमृत अर्थसंकल्प म्हणत आहे. अमृत अर्थसंकल्प असेल तर त्याआधी सगळे विषारी अर्थसंकल्प होते का? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. 

10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू - योगी आदित्यनाथदरम्यान, बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी सपा-आरएलडी आघाडीचे नाव न घेता त्यांचा उल्लेख सडलेला माल असा केला. एवढेच नाही, तर सरकारमध्ये येण्याचे त्यांचे स्वप्न 'कयामत'च्या दिवसापर्यंतही पूर्ण होणार नाही. 10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. ते बुलंदशहर येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करत होते.  

योगी आदित्यनाथ म्हणाले, हे लोक (एसपी-आरएलडी) पुन्हा नव्या कव्हरमध्ये आले आहेत. माल तोच आहे, कव्हर नवीन आहे. माल तोच सडलेला आहे, ज्यांनी असुरक्षितता, दंगली आणि माफिया दिले. ते आजही म्हणत आहेत, येऊ द्या सरकार. आम्ही म्हणालो, असे होणार नाही. 'कयामत'च्या दिवसापर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही. हे समजून घ्या. पण लक्षात असू द्या, 10 मार्चनंतर ही संपूर्ण गर्मी शांत करू.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Samajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा