शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 17:06 IST

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने आजारी असलेल्या तिवारी यांच्यावर दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. एकेकाळचे काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील दिग्गज नेते असलेल्या तिवारी यांचा आज जन्मदिन होता. जन्मदिनीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वातंत्र्योत्तर काळात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत नारायण दत्त तिवारी हे प्रजासमाजवादी पक्षाकडून निवडून आले होते. त्यानंतर काही काळाने ते काँग्रेसमध्ये सामील झाले. दरम्यान, तिवारी यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. तसेच उत्तर प्रदेशचे विभाजन होऊन नव्याने स्थापन झालेल्या उत्तराखंडचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवले होते. तसेच १९८६ ते ८७ या काळात त्यांनी परराष्ट्रमंत्रिपद भूषवले होते. तर २००७ ते २००९ या काळात त्यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.    १९९० च्या दशकात एन.डी. तिवारी यांना पंतप्रधानपदाचे तगडे दावेदार मानले जात होते. मात्र तेव्हाच्या स्पर्धेत पी. व्ही. नरसिंहराव त्यांना वरचढ ठरले. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत केवळ ८०० मतांनी पराभव झाल्याने त्यांची पंतप्रधानपदाची संधी हुकली होती. पुढे १९९४ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी तिवारी काँग्रेसची स्थापना केली. मात्र काही वर्षांनी त्यांनी आपला पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन केला.  

टॅग्स :IndiaभारतPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेश