शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

उत्तर प्रदेशात 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे अन् मल्टीप्लेक्स, नियमावली जारी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 13, 2020 5:19 PM

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी आदेश जारी करत, 50 टक्के क्षमतेने 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि थिएटर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि गृह मंत्रालयाच्या नयमांचे पालन करणे बंधनकारक असेल. (Uttar Pradesh)

ठळक मुद्देउत्तर प्रदेशाती योगी सरकारनेही मंगळवारी 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स सुरू करण्यासाठी नियमावली जारी केली आहे.50 टक्के कॅपेसिटीने होणार सुरुवात चित्रपट गृहांत सॅनिटायझेशनचे काम सुरू

लखनौ - केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे (Cinema Hall) आणि थिएटर्स (Theater) पुन्हा एकदा खुली करण्यासाठी दिशा-निर्देश जारी केले आहेत. यानंतर आता, उत्तर प्रदेशाती योगी सरकारनेही मंगळवारी 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स सुरू करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी आदेश जारी करत, 50 टक्के क्षमतेने 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि थिएटर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि गृह मंत्रालयाच्या नयमांचे पालन करणे बंधनकारक असेल. याशिवाय, कंटेनमेंट झोनच्या बाहेरच चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स आणि थिएटर खुली करण्यास परवानगी असणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्ह्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. 

50 टक्के कॅपेसिटीने होणार सुरुवात -पीव्हीआर (PVR), आयनॉक्स (Inox), सिनेपोलीस (Cinepolis) आणि मुक्ता सिनेमाज (Mukta Cinemas)यांच्यासह मल्टीप्लेक्स चालवणाऱ्या कंपन्या 50 टक्के कॅपेसिटीसह सुरुवात करायला तयार आहेत. यापूर्वी,  सिनेपोलीस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग संपत म्हणाले, ‘आम्ही केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत करतो. आमच्या 350 स्क्रीनपैकी जवळपास 75 टक्के स्क्रीन खुल्या राहतील.'

चित्रपट गृहांत सॅनिटायझेशनचे काम सुरू -सध्या चित्रपटगृहांमध्ये स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे काम सुरू आहे. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी सांगितले, 'प्रेक्षकांच्या पृकृतिची पूर्ण काळजी घेण्याची तयारी आम्ही करत आहोत. त्यांनी न घाबरता यावे आणि चित्रपटांचा पूर्वी प्रमाणेच आनंद घ्यावा. मात्र, त्यांनाही आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक असेल.'

असे असेल सिटिंग अरेंजमेंट -व्यवस्थापकांनी सांगितले, चित्रपटगृहांमधील सिटिंग अरेंडमेंट बदललेले असेल. आता प्रत्येक सीटनंतर दुसरे सीट रिकामे ठेऊनच प्रेक्षकांना बसवले जाईल. प्रत्येक शोनंतर संपूर्ण चित्रपटगृह पुन्हा एकदा सॅनिटाईझ केले जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे आणि गांभीर्याने केले जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथcinemaसिनेमा