शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:13 IST

शाळेची फी भरण्यास उशीर झाला म्हणून इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला खोलीत बंद करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.

शाळेची फी भरण्यास उशीर झाला म्हणून इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला खोलीत बंद करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. उत्तर प्रदेशातील हापूर येथील एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला. विद्यार्थ्याने आपल्या वडिलांसह पोलीस ठाणे गाठून शाळेविरुद्ध कारवाईची मागणी केली. त्यानंतर एका महिला शिक्षकेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी बाबूगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या शाळेच्या शिक्षकांनी एका खोलीत बंद करून मारहाण केली, ज्यामुळे त्याच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा झाल्या. विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी आणि पुतण्या याच शाळेत शिकतात. तीन मुलांपैकी एका मुलाची शाळेची फी वेळेवर भरता आली नाही म्हणून शिक्षकांनी त्याला मारहाण बेदम केली.

विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले की, त्यांनी गेल्या महिन्यातच शाळेत सुमारे १२ हजार रुपये फी जमा केली आणि मुलाची फी भरण्यासाठी शाळेकडून वेळ मागितला. परंतु, सोमवार, २५ ऑगस्ट रोजी शाळा बंद होताना शाळेतील शिक्षकांनी फी भरली नाही म्हणून त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यांनी असाही आरोप केला आहे की, त्यांच्या मुलाला प्रथम शाळेच्या गॅलरीत आणि नंतर एका खोलीत बंद करून मारहाण केली. याबाबत पालकांनी जाब विचारला असता शाळा प्रशासनाने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि उडवाउडवीचे उत्तर दिली.

३ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठून त्यांच्या मुलासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका महिला शिक्षिकेसह तीन जणांविरोधात बीएनएसच्या कलम ११५ (२) आणि १२७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSchoolशाळा