शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात, १४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 08:55 IST

Accident News : प्रयागराज-लखनौ महामार्गावर माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव बोलेरोने उभ्या असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेमुळे झाला.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात काल रात्री प्रयागराज-लखनौ महामार्गावर माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव बोलेरोने उभ्या असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेमुळे झाला. बोलेरो चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे.अपघातग्रस्त बोलेरोमधून प्रवास करत असलेले प्रवासी हे वरातीवरून येत होते. ही सर्व मंडळी शेखपूर गावात झालेल्या विवाह सोहळ्यात सहभागी होऊन घरी परतत होती. परतत असताना सदर बोलेरो माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली असताना ती जाऊन उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की त्याच बोलेरोचा पूर्ण चेंदामेंदा झाला. तसेच सर्व प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एकूण १४ मृतांमध्ये ६ मुलांचा समावेश आहे.

अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गॅस कटरच्या मदतीने बोलेरो गाडी कापत सर्व १४ मृतदेह बाहेर काढले. संपूर्ण मदतकार्यासाठी दोन तास लागले. दरम्यान,पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार बोलेरोमधील १२ वऱ्हाडी हे कुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिगरापूर चौसा गावातील होते. तर बोलेरोचालकासह अन्य दोघे हे दुसऱ्या एका गावातील होते.दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी जाऊन पीडित व्यक्तींची मदत करण्याचे आदेश दिले आहेत. 

 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश