माझा राजकीय अस्त्र म्हणून वापर - वड्रा

By Admin | Updated: November 22, 2015 23:57 IST2015-11-22T23:57:23+5:302015-11-22T23:57:23+5:30

माझ्याविरुद्ध राजकीय तपास केला जात असून, अशा पद्धतीने पिच्छा पुरवत राजकीय अस्त्र म्हणून वापर केला जात आहे, या शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी तोफ डागली.

Use as my political weapon - Vadra | माझा राजकीय अस्त्र म्हणून वापर - वड्रा

माझा राजकीय अस्त्र म्हणून वापर - वड्रा

नवी दिल्ली : माझ्याविरुद्ध राजकीय तपास केला जात असून, अशा पद्धतीने पिच्छा पुरवत राजकीय अस्त्र म्हणून वापर केला जात आहे, या शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी तोफ डागली.
हरियाणा आणि राजस्थान या दोन भाजपशासित राज्यांनी रॉबर्ट वड्रा यांच्या जमीन प्रकरणाचा तपास चालविला आहे. कुणी इतरांप्रमाणे व्यवसाय करीत असेल तर त्यापासून राजकारण वेगळे केले जावे, असे सांगत त्यांनी पत्नी प्रियंका गांधी यांच्या राजकारणाचा स्वत:च्या व्यवसायाशी सातत्याने संबंध जोडला जात असल्याकडे लक्ष वेधले. जनतेचे लक्ष विचलित करण्याची गरज भासेल तेव्हा भाजपने माझ्यावर हल्ले चालवत राजकीय अस्त्र म्हणून वापर केला जात आहे. कायद्यानुसार माझ्या व्यवसायाची पारदर्शकता बाळगली जात आहे.

Web Title: Use as my political weapon - Vadra