शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मध्य पूर्वेतील युद्धात भारताचा 'प्लॅन बी' ठरतोय यशस्वी; PM नरेंद्र मोदींनी संसदेत केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:16 IST

भारतावरील परिणाम कमी करण्यासाठी सरकार धोरणात्मक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - मध्य पूर्वेतील युद्ध अद्याप सुरू आहे. अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण संघर्षाचा २४ वा दिवस असून स्ट्रेट होर्मुझमधील जल वाहतूक ठप्प झाल्याने जगात तेल, गॅस संकट वाढले आहे. जे देश ऊर्जा पुरवठ्यासाठी आयातीवर निर्भर आहेत त्यांना याचा जास्त फटका बसला आहे. मध्य पूर्वेतील तणावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज संसदेत पंतप्रधानांनी सरकार या संकटांना तोंड देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत प्लॅन बीही सांगितला.

मध्य पूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. कच्चे तेल, आवश्यक गॅसचा बहुतांश पुरवठा याच मार्गाने येतो. परंतु युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझमधून टँकर आणणे आव्हानात्मक बनले आहे. भारतात क्रूड, गॅसपासून खतांची आयातही याच देशातून होते. LPG ची ६० टक्के आयातही केली जाते. व्यावसायिक जहाजांवर हल्ला आणि होर्मुझमधील अडथळा मंजूर नाही. सरकार या मार्गावरून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिथल्या प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सरकार पूर्णत: सतर्क मोडला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मध्य पूर्वेतील संकटाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे आणि भारत आखाती देशांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ऊर्जा हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ऊर्जेचा एक प्रमुख जागतिक स्रोत असलेला पश्चिम आशिया सध्याच्या संकटामुळे प्रभावित झाला आहे. भारतावरील परिणाम कमी करण्यासाठी सरकार धोरणात्मक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. 

सरकारचा 'प्लॅन बी' ठरतोय यशस्वी

तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत'प्लॅन बी' चा उल्लेख केला. जो भारतात पुरवठा सुनिश्चित करण्यास मदत करत आहे. आम्ही आमच्या आयातीमध्ये सातत्याने विविधता आणली आहे. पूर्वी भारत केवळ २७ देशांकडून ऊर्जा आयात करत असे, पण आता ही संख्या ४१ पर्यंत वाढली आहे. याशिवाय आमची रिफायनरी क्षमताही वाढली आहे. भारताकडे ५.३ दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलाचा साठा आहे. आमचे लक्ष्य ६.५ दशलक्ष मेट्रिक टन आहे. सर्व अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारी जहाजे भारतात सुरक्षितपणे पोहोचतील याची खात्री करणे हा आमचा प्रयत्न आहे असं मोदींनी सांगितले. 

दरम्यान, भारतात एलपीजीचे उत्पादन सातत्याने वाढवले ​​जात आहे. गेल्या दशकात इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यात आले आहे. परिणामी पेट्रोलची खरेदी कमी झाली आहे. देशात सध्या ५३ लाख मेट्रिक टन पेट्रोलियम उपलब्ध आहे. आम्ही पर्यायी इंधन पर्यायांच्या दिशेने पावले उचलली आहेत ज्यामुळे भारताचे भविष्य सुरक्षित होईल असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी सध्याच्या संकटाचा हवाला देत व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : India's 'Plan B' in Middle East Conflict Succeeds, PM Modi States

Web Summary : Amid Middle East tensions disrupting energy supplies, PM Modi highlighted India's diversified import strategy and increased refinery capacity. The nation has expanded its energy import sources and boosted LPG production to mitigate global economic impacts, ensuring a secure energy future.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCrude Oilखनिज तेलOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पIranइराण