होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:54 IST2026-04-13T20:51:50+5:302026-04-13T20:54:01+5:30
US-Iran Crisis: भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचे आश्वासन!

होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
US-Iran Crisis: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारलेला नाही आणि पुढेही भारताला पूर्ण सहकार्य केले जाईल.
भारतामधील इराणचे राजदूत मोहम्मद फताहली यांनी सांगितले की, “आपण भारत सरकारकडे चौकशी करू शकता, आम्ही कोणताही टोल घेतलेला नाही.” त्यांनी यावेळी भारत-इराण संबंध अधिक दृढ असल्याचेही अधोरेखित केले.
#WATCH दिल्ली: होर्मुज जलडमरूमध्य से गुज़रने वाले भारतीय जहाजों पर भारत में इस्लामिक रिपब्लिक ऑफ़ ईरान के राजदूत डॉ. मोहम्मद फतहली ने कहा, "भारतीय जहाजों के लिए, आप जानते हैं कि भारत सरकार के साथ हमारे अच्छे संबंध हैं...हम भारतीय जहाजों के लिए अच्छी तैयारी चाहते हैं...आप जानते… pic.twitter.com/ZkrBrbdrmT
— ANI_HindiNews (@AHindinews) April 13, 2026
भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचे आश्वासन
इराणने भारतीय जहाजांना होर्मुझमधून सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. इराण भारत सरकारच्या सतत संपर्कात असून, जहाजांना अडथळ्याशिवाय मार्ग उपलब्ध करून दिले जाईल, असे स्पष्ट केले.
भारतानेही टोलच्या बातम्या फेटाळल्या
भारताने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, इराणला कोणताही टोल देण्यात आलेला नाही. युद्ध सुरू झाल्यानंतरही ९ LPG जहाजे सुरक्षित बाहेर पडली. सध्या सुमारे १५ भारतीय जहाजे फारसच्या आखातात अडकलेली आहेत, मात्र लवकरच ती सर्व जहाजे सुरक्षित बाहेर काढली जातील. एकूणच, इराणकडून दिलेल्या आश्वासनामुळे भारताला तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी अमेरिका-इराण तणाव कायम असल्याने परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी पुढील घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.