शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही?; अमेरिकन मासिकाच्या दाव्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 1:46 PM

पाकिस्तानच्या ताफ्यातील सर्व एफ-16 विमानं सुरक्षित असल्याचा दावा

न्यू यॉर्क: पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील सर्व एफ-16 विमानं सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेच्या एका मासिकानं केला आहे. पाकिस्तानचं एफ-16 पाडल्याचा भारताचा दावा चुकीचा असू शकतो, असं 'फॉरेन पॉलिसी' या मासिकानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं मासिकानं हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या दोन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन वृत्त दिल्याचं मासिकानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं अमेरिकेकडून एफ-16 विमानं खरेदी केली होती. या विमानांची मोजदाद केल्यास ती योग्यच असल्याचं दोन अधिकाऱ्यांनी मासिकाला सांगितलं. एक एफ-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा विचारात घेतल्यास पाकिस्तानच्या ताफ्यात एक विमान कमी असायला हवं होतं. मात्र तसं झालेलं नाही, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. यानंतर 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला.

27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये आकाशात चकमक झाली. या दरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 मधून पाकिस्तानच्या एफ-16 वर निशाणा साधला. अभिनंदन यांच्या अचून निशाण्यामुळे एफ-16 विमान कोसळलं, अशी माहिती हवाई दलानं पत्रकार परिषदेत दिली. याच पत्रकार परिषदेत हवाई दलानं आमरार क्षेपणास्त्राचे काही तुकडेदेखील दाखवले. पाकिस्तानच्या ताफ्यातील केवळ एफ-16 विमानच आमरार क्षेपणास्त्र डागू शकतं. त्यामुळे पाकिस्ताननं भारताविरोधात एफ-16 चा वापर केला, हे सिद्ध होतं, असा दावा हवाई दलानं केला होता. भारताविरोधात एफ-16 विमानाचा वापर केला नाही, असा दावा पाकिस्ताननं केला होता. पाकिस्तानचा तो दावा हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर कपूर यांनी खोडून काढला होता. 'प्रत्येक विमानाचा एक विशिष्ट इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. पाकिस्तानी विमानाकडून मिळालेला सिग्नल हवाई दलानं टिपला. तो एफ-16 शी जुळतो. पाकिस्तानकडे असलेल्या विमानांपैकी केवळ एफ-16 विमान आमरार मिसाईल घेऊन जाऊ शकतं आणि भारतीय हवाई दलानं पाडलेल्या विमानाजवळ आमरार मिसाईलचे अवशेष सापडले आहेत. यावरुन पाकिस्ताननं एफ-16 वापरल्याचं स्पष्ट होतं,' असं कपूर यांनी सांगितलं होतं.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक