शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
4
SMAT: डेब्यू सामन्यातच मोठा धमाका, ५५ चेंडूत ११४ धावा ठोकल्या; कोण आहे अमित पासी?
5
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
6
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
7
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
8
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
9
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
10
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
11
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
12
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
13
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
14
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
15
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
17
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
18
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
19
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
20
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:07 IST

IPS Bajrang Prasad Yadav : बजरंग प्रसाद यादव यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. २०१४ मध्ये जेव्हा ते दहावीत होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली.

वडिलांच्या हत्येनंतरही मुलाने खचून न जाता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससी उत्तीर्ण करण्याचा मोठा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशच्या बजरंग प्रसाद यादव यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे.  आयुष्यात अनेक संकटं, आव्हानं, बिकट परिस्थितीचा सामना करत त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल स्थान मिळवलं. बजरंग यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की,  त्यांचा मुलगा अधिकारी व्हावा. आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी बजरंग यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस होण्याचा निर्णय घेतला.

उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील रहिवासी बजरंग प्रसाद यादव यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. २०१४ मध्ये जेव्हा ते दहावीत होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली. वडिलांच्या हत्येने ते पूर्णपणे हादरले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही खूप वाईट होती. दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती, पण बजरंग प्रसाद यांनी हार मानली नाही. 

 फी भरण्यासाठी विकलं धान्य

कठीण काळातही जिद्द सोडली नाही आणि आपला अभ्यास सुरू ठेवला. आर्थिक अडचणींमुळे, त्यांनी ट्यूशन फी भरण्यासाठी घरातील धान्यही विकलं. अनेक अडचणी असूनही, बजरंग यांनी कधीच आपलं शिक्षण सोडलं नाही. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये ते अपयशी ठरले, पण कठोर परिश्रम करत राहिले. 

यूपीएससी परीक्षेत ४५४ वा रँक 

सततच्या कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे फळ म्हणजे २०२२ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षेत ४५४ वा रँक मिळवला. हे यश त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. यासोबतच बजरंग प्रसाद यादव यांचं यश लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे जे जीवनातील कठीण परिस्थितींना तोंड देत आपलं ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश