UPSC वाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली बैठक

By Admin | Updated: August 4, 2014 14:40 IST2014-08-04T14:28:01+5:302014-08-04T14:40:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी UPSC वादाविषयी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिका-यांची आपतकालीन बैठक बोलवली आहे. संध्याकाळी नेपाळ दौ-यावरुन परतल्यावर मोदी ही बैठक घेणार आहेत.

UPSC dispute: Prime Minister Narendra Modi called for the meeting | UPSC वाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली बैठक

UPSC वाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली बैठक

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि.४ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी UPSC वादाविषयी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिका-यांची आपतकालीन बैठक बोलवली आहे. संध्याकाळी नेपाळ दौ-यावरुन परतल्यावर मोदी ही बैठक घेणार असून बैठकीत यूपीएससी वादाविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल असे समजते. 
गेल्या १५ दिवसांपासून केंद्रीय लोकसेवा परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या अभ्यासक्रमातील लोकसेवा कल चाचणीला (सी- सॅट) विरोध आहे. या विषयात इंग्रजी गद्य उता-यांवर आधारीत प्रश्न जास्त असल्याने इंग्रजी माध्यमात शिकणा-या विद्यार्थ्यांचे या विषयामुळे फावते असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असून या विषयावर तोडगा न काढल्यास युवा मतदारांची नाराजी ओढवण्याची भिती सत्ताधा-यांना वाटते. राज्यसभा आणि लोकसभेतही विरोधकांनी गोंधळ घालून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या वादाविषयी अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेतील असे सत्ताधा-यांतर्फे वारंवार सांगितले जात होते. 
सोमवारी संध्याकाळी मोदी नेपाळ दौ-यावरुन परतणार असून दौ-यावरुन परतताच मोदी सात रेसकोर्स येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन मोदी यूपीएससी वादावर अंतिम तोडगा काढतील असे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: UPSC dispute: Prime Minister Narendra Modi called for the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.