शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:52 IST

पवन कुमार याने २३ वेळा अपयश आल्यानंतरही हार मानली नाही आणि आता मोठं यश मिळवलं आहे.

स्पर्धेच्या युगात यश मिळविण्यासाठी लोकांना अनेक वेळा अपयशाला सामोरं जावं लागतं. लोक अपयशातून शिकतात आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जातात. शेवटी ते यशस्वी होतात आणि इतरांसाठीही आदर्श बनतात. कोडरमाच्या चांदवाडा ब्लॉकमधील पथलगड्डा येथील रहिवासी पवन कुमार याने असंच काहीसं केलं आहे, २३ वेळा अपयश आल्यानंतरही त्याने हार मानली नाही आणि आता मोठं यश मिळवलं आहे.

पथलगड्डा येथील शेतकरी रामदेव यादव आणि संजू देवी यांचा एकुलता एक मुलगा पवन कुमार याचं प्राथमिक शिक्षण गावातील शुभ सोनिया शाळेत झालं. त्यानंतर त्याने सैनिक स्कूल तिलैया येथून सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये मॅट्रिक, २०१९ मध्ये इंटरमिजिएट आणि २०२२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या झाकीर हुसेन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. 

२३ वेळा नापास झाल्यानंतरही हार मानली नाही

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एनडीएची परीक्षाही दिली. ज्यामध्ये तो चार वेळा नापास झाला. त्याने आठ वेळा  कंबाइंड डिफेंस सर्व्हिसेस परीक्षा, तीन वेळा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा आणि आठ वेळा एफसीएटी परीक्षा दिली. परंतु मुलाखतीत पोहोचल्यानंतर त्याचं मेरिट लिस्टमध्ये यायचं नाही. अशाप्रकारे त्याला एकूण २३ वेळा अपयशाला सामोरं जावं लागलं. त्याने हार मानली नाही आणि ४ वर्षे कठोर परिश्रम करत राहिला. आता यश मिळालं आहे. सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स(CAPF) परीक्षेत ३१५ वा रँक मिळवून तो असिस्टंट कमांडंट झाला आहे.

सेल्फ स्टडीवर केलं लक्ष केंद्रित 

पवन कुमारने लोकल १८ शी संवाद साधताना सांगितलं की, गरीब शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याने हजारीबागसारख्या छोट्या शहरात बहिणीच्या घरी राहून परीक्षेची तयारी केली. याच काळात ऑनलाईन स्टडी मटेरियल, लष्करी सेवेशी संबंधित मित्रांचं मार्गदर्शन आणि सेल्फ स्टडी यावर अधिक लक्ष केंद्रित केलं. सकाळी लवकर उठून ९ वाजेपर्यंत अभ्यास करणं, नंतर नाश्ता करणं आणि विश्रांती घेणं, नंतर पुन्हा अभ्यास करणं आणि त्यानंतर संध्याकाळी जिमला जाणं हा त्याचा रोजचा दिनक्रम असायचा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण