शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मायावती विजेच्या उघड्या तारेसारख्या, हात लावेल त्याचं मरण निश्चित; मंत्र्यांचं 'शॉकिंग' विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 17:56 IST

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नवनियुक्त मंत्री गिर्राज सिंह धर्मेश यांनी मायावतींविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. ...

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नवनियुक्त मंत्री गिर्राज सिंह धर्मेश यांनी मायावतींविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. मायावती ह्या विजेच्या उघड्या तारेसारख्या आहेत. जो त्यांच्याजवळ जाईल, तो मरून जाईल, अशी मुक्ताफळे या मंत्रिमहोदयांनी उधळली. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामाध्ये गिर्राज सिंह धर्मेश यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडे समाजकल्याण, अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण विभागाचे मंत्रिपद सोपवण्यात आले होते. मायावतींवर टीका करताना ते म्हणाले की,''कायदेशीपणे ब्रह्मदत्त द्विवेदी यांनी मायावतींचे प्राण वाचवले होते. भाजपाने मायावतींना तीन वेळा मुख्यमंत्री केले. ही बाब त्यांना माहीत असेलच.''  ते पुढे म्हणाले की, मायावती कुणाच्याही सख्ख्या होऊ शकत नाहीत. समाजवादी पक्षालाही त्यांनी दगा दिला आहे. त्या शुन्यावर होत्या, लोकसभा निवडणुकीत दहावर पोहोचल्या आणि सपा पाच जागांवरच अडखळली. त्या विजेच्या उघड्या तारेसारख्या आहेत. जो त्यांना हात लावेल तो तिथेच मरेल.''  कांशीराम यांचा मृत्युसुद्धा संशयास्पद परिस्थितीत झाला, असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. तसेच त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यासंदर्भात मागणी करणार आहे, असे गिर्राज सिंह धर्मेश पुढे म्हणाले. मायावतींनी जी अमाप संपत्ती गोळा केली आहे, त्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे मायावतींसमोर आता फार पर्याय उरलेले नाहीत. त्यातच भाऊ आनंद कुमार यांचा प्लॉट जप्त केल्यानंतर मायावती घाबरलेल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.   

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश