शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत उपेंद्र कुशवाह यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 15:02 IST

बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

ठळक मुद्देबिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, मला आणि माझ्या पक्षाला संपवणे हाच त्यांच्या अजेंडा आहे

नवी दिल्ली -  बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहेत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत काहीही काम झालेले नाही. बिहार जिखे होते तिथेच आजही आहे, अशी टीका कुशवाहा यांनी केली.'' कुशवाह हे मोदी सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळत होते. यावेळी एनडीएमध्ये होत असलेली आपली घुसमटही स्पष्टपणे बोलून दाखवली. ''एनडीएमधील माझा अनुभव अत्यंत वाईट आहे. बिहारमधील जनतेला न्याय मिळावा यासाठी मी एनडीएच्या बैठकीत माझे मत वारंवार मांडले. मात्र नितीश कुमार बिहारी जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत, असे भाजपाकडून सांगण्यात येत होते.'' असे कुशवाह म्हणाले. तसेच राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, मला आणि माझ्या पक्षाला संपवणे हाच त्यांच्या अजेंडा आहे, तसेच हे काम भाजपाने सुरू केले आहे. असा आरोप कुशवाह यांनी केला.  

आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी या पक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपाकडून त्या मागणीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे कुशवाहा गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे एनडीएला सोडचिठ्ठी देऊन विरोधी पक्षांच्या आज होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे आपला राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) हा पक्ष शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दल या या पक्षाल विलीन करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे कुशवाहा यांच्या पक्षातील अनेक नेते जेडीयूच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी