शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

UPA सरकार, २ पॉईंट्सची कॅबिनेट नोट आणि..., MSP वरून शिवराज सिंहांकडून विरोधकांची कोंडी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 20:06 IST

Shivraj Singh Chauhan: किमान हमीभावाच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. (Monsoon Session Of Parliament ) मात्र केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधकांचीच कोंडी केली.

किमान हमीभावाच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.  एमएसपीच्या मुद्द्यावरून सपाचे नेते रामजी लाल सुमन आणि काँग्रेसचे नेते सुरजेवाला यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधकांचीच कोंडी केली. शिवराज सिंह यांनी मनमोहन सिंग सरकारच्या काळातील दोन पॉईंटची एक कॅबिनेट नोट दाखवली ज्याच्या आधारावर तेव्हाच्या सरकारने एमएसपी देण्यास नकार दिला होता. 

शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, शेतकरी आमच्यासाठी देवासारखे आहेत. तसेच त्यांची सेवा करणं हे आमच्यासाठी त्यांची पूजा करण्यासारखं आहे. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी जुलै २००० मध्ये स्थापन केलेल्या एका समितीचाही हवाला देत सांगितले की, या समितीच्या स्थापनेचे ३ उद्देश होते. पहिला एमएसपी मिळवून देणे, दुसरा कृषी मूल्याची अधिक स्वायत्तता आणि तिसरा कृषी वितरण प्रणालीसाठी सल्ले देणे. 

शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले की, आतापर्यंत या समितीच्या २२ बैठका झाल्या आहेत. त्यांच्या ज्या शिफारशी असतील, त्यावर विचार केला जाईली, असे सांगितले. तेव्हा रामजीलाल सुमन यांनी शिवराज सिंह हे विषयांतर करत असल्याचा आरोप केला. तसेच एमएसपीबाबत स्पष्ट उत्तर द्या, असे सांगितले. तेव्हा कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यापासून  उत्पादनावर होणाऱ्या खर्चात कपात करण्यापर्यंत, त्याबरोबरच किसान सन्मान निधी, खते यावर सरकारकडून १ लाख ६८ हजार कोटी रुपयांच्या सब्सिडीसारख्या मोदी सरकारच्या सहा सूत्री कार्यक्रमाबाबत माहिती दिली. त्यानंतर रणदीप सुरजेवालांसह इतर नेत्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.  

यावेळी शिवराज सिंह यांनी यूपीएस सरकारच्या काळातील एक कॅबिनेट नोट दाखवत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच विरोधक सभागृहात नक्राश्रू ढाळत असल्याचा आरोप केला. त्यांनी यूपीए आणि एनडीए सरकारच्या काळात एमएसपीद्वारे होणाऱ्या खरेदीचे आकडे दाखवले. त्यांनी यूपीएच्या काळातील एक कॅबिनेट नोटसुद्धा पटलावर ठेवली. त्यामध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने शेतीच्या उत्पादन खर्चावर ५० टक्क्यांहून अधिक एमएसपी देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. याशिवाय स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करण्यासही मनमोहन सिंग सरकारने नकार दिला, हेही कृषिमंत्र्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन