शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, फक्त..." अरविंद केजरीवालांचे मोठे विधान
4
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
6
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
7
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
8
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
9
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
10
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
11
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
12
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
13
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
14
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
15
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
16
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
17
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
18
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
19
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
20
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय

Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 1:19 PM

Yogi Adityanath Oath Ceremony : यूपी निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर योगी मंत्रिमंडळाच्या (Yogi Cabinet) शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत  (UP Assembly Election Result) भारतीय जनता पक्षाच्या (BJP)दणदणीत विजयानंतर आता सरकार स्थापनेची चर्चा रंगली असून योगी आदित्यनाथ होळीपूर्वी शपथ (Yogi Adityanath Oath Ceremony) घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. होळीपूर्वी शपथविधीबाबत पक्षप्रमुख विचारमंथन करत असून एकमत झाल्यानंतर तारीख जाहीर केली जाणार आहे.

यूपी निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर योगी मंत्रिमंडळाच्या (Yogi Cabinet) शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे. यातच असे सांगण्यात येत आहे की, होळीपूर्वी शपथविधी होऊ शकतो. कारण होळी 17 आणि 18 मार्चला आहे, तर 19 मार्च ही एमएलसी (MLC) नामांकनांसाठी शेवटची तारीख आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सहमती झाली तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 15 मार्च म्हणजेच मंगळवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा भव्यदिव्य होण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित राहू शकतात. तसेच, इतर अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते देखील शपथविधीला उपस्थित राहू शकतात. याशिवाय, भाजपशासित इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्यात उपस्थित राहू शकतात.

भाजपने जिंकल्या 255 जागाउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये  (UP Election Result) निवडणूक आयोगाने रात्री उशिरा 403 जागांवर निवडणूक निकाल जाहीर केला, ज्यामध्ये भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह 273 जागा जिंकल्या आणि पूर्ण बहुमत मिळवले. या निवडणुकीत भाजपने 255 जागा जिंकल्या, तर अपना दल 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या. याचबरोबर, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाने 111 जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपला 41.29 टक्के, तर समाजवादी पक्षाला 32.06 टक्के आणि बहुजन समाज पक्षाला 12.88 टक्के मते मिळाली आहेत.

योगी आदित्यनाथ जिंकले, केशव प्रसाद मौर्य पराभूतमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहर (Yogi Adityanath win from Gorakhpur Sadar) विधानसभेची जागा एक लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकाने जिंकली. मात्र, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचा कौशांबी जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघात सात हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी पराभव केला.  पल्लवी पटेल यांना 1,06,278 मते मिळाली तर केशव प्रसाद मौर्य यांना 98,941 मते मिळाली. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह