गोरखपूरचे भाजपाचे खासदार रवी किशन यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्येभाजपाचे सरकार येईल, असा दावा त्यांनी केला आहे. रवी किशन म्हणाले की, "तेथील जनतेला विकास आणि योजनांचा लाभ हवा आहे, त्यामुळेच यावेळी दीदी (ममता बॅनर्जी) सत्तेतून जात आहेत हे निश्चित आहे. तिथे भाजपाची सत्ता येणार."
"तुम्ही तिथे गेलात तर बंगालमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की हे 'मिनी पाकिस्तान'आहे." आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता येथील रॅलीचाही उल्लेख केला. "यावेळी दीदी जात आहेत, हे तुम्ही खात्रीशीर लिहून घ्या. निवडणुका येत-जात असतात, पण तिथे अनेक ठिकाणी गेल्यावर तुम्हाला ते 'मिनी पाकिस्तान' असल्यासारखं वाटेल."
"पश्चिम बंगालच्या जनतेला आता सत्य समजलं आहे. मी महादेव आणि माता दुर्गा यांते आभार मानतो की आता तिथली जनता जागी झाली आहे. विरोधकांकडून विरोध तेव्हाच होतो, जेव्हा त्यांना माहित असतं की ते ही निवडणूक आणि हे राज्य हरणार आहेत. काल मी कोलकातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकलं, तिथे लाखो लोक आले होते."
"मी आजही दाव्याने सांगतो की, कोलकाताची निवडणूक यावेळी भाजपाच्या बाजूने आहे. तिथली गर्दी आणि वातावरणाने हे स्पष्ट केलं आहे की, नरेंद्र मोदी हीच लोकांची पसंती बनले आहेत आणि आता त्यांना दीदींना तिथून हटवायचं आहे. सरकारच्या असंख्य योजना आहेत. कोलकातामधील प्रत्येक गरीब माणूस, यूपी-बिहारचा टॅक्सी चालक किंवा फेरीवाला, या सर्वांना आता आपल्या मुलांसाठी सरकारी योजनांचा लाभ हवा आहे" असं जनतेला संबोधित करताना रवी किशन यांनी म्हटलं आहे.
Web Summary : BJP MP Ravi Kishan criticized Mamata Banerjee, claiming parts of Bengal resemble 'Mini Pakistan'. He asserted BJP's victory in West Bengal, citing public desire for development and PM Modi's popularity. Kishan highlighted growing support for BJP and the people's yearning for government benefits.
Web Summary : भाजपा सांसद रवि किशन ने ममता बनर्जी की आलोचना करते हुए बंगाल के कुछ हिस्सों को 'मिनी पाकिस्तान' बताया। उन्होंने पश्चिम बंगाल में भाजपा की जीत का दावा किया, विकास की सार्वजनिक इच्छा और पीएम मोदी की लोकप्रियता का हवाला दिया। किशन ने भाजपा के बढ़ते समर्थन और सरकारी लाभों के लिए लोगों की लालसा पर प्रकाश डाला।