UP News : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित पीस कमिटीच्या बैठकीत क्षेत्राधिकारी (CO) कुलदीप कुमार यांनी इराण-इस्त्रायल संघर्षाच्या मुद्द्यावर भारतात आंदोलन करण्याचा विचार करणाऱ्यांना कडक इशारा दिला. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेते इमरान प्रतापगढी यांनी या वक्तव्यावर टीका करत असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.
बैठकीत प्रशासनाचा कडक इशारा
अलविदा जुमा आणि ईद-उल-फितर नमाजाच्या पार्श्वभूमीवर पीस कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत CO कुलदीप कुमार यांनी इराण-इस्त्रायल संघर्षाचा उल्लेख करत सांगितले इशारा दिला की, जर कोणाला इराण-इस्त्रायल संघर्षाबद्दल इतकीच चिंता असेल, तर त्यांनी इराणमध्ये जाऊन लढाईत सहभागी व्हावे. पण भारतात बसून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये.
कायदा-सुव्यवस्थेबाबत ‘झिरो टॉलरन्स’
बैठकीदरम्यान सिटी मॅजिस्ट्रेट सुधीर कुमार आणि पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नमाज किंवा सणांच्या वेळी कोणत्याही देशाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात नारेबाजी, पोस्टरबाजी किंवा आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. प्रशासनाने स्पष्ट केले की, परदेशातील संघर्षाचा परिणाम भारतातील कायदा-सुव्यवस्थेवर होऊ दिला जाणार नाही.
शांतता आणि बंधुभावाचे आवाहन
अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. भारतात राहणारा प्रत्येक नागरिक प्रथम भारतीय असल्याचे सांगत प्रशासनाने इशारा दिला की, जर कोणी भडकावू वर्तन केले किंवा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर पोलिस कठोर कारवाई करतील.
काँग्रेस नेते इमरान प्रतापगढी यांचा पलटवार
दरम्यान, काँग्रेस नेते इमरान प्रतापगढी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना पोलिस अधिकाऱ्यांच्या भाषेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, जे लोक इस्रायलच्या समर्थनात सोशल मीडियावर वक्तव्ये करतात किंवा इतर भारतीय नागरिकांविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरतात, त्यांच्यावर कोण कारवाई करणार? लोकशाही देशात वर्दीतील अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण
CO कुलदीप कुमार यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण प्रशासनाच्या कडक भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर काहींनी अधिकाऱ्यांच्या भाषाशैलीवर टीका केली आहे.
Web Summary : UP's CO Kuldeep Kumar warned against protesting Iran-Israel conflict in India during a peace meeting. He stated those concerned should go fight there, not disrupt India. His statement sparked political debate and criticism over his language.
Web Summary : यूपी के सीओ कुलदीप कुमार ने शांति बैठक में भारत में ईरान-इजरायल संघर्ष का विरोध करने वालों को चेतावनी दी। उन्होंने कहा कि चिंतित लोग वहां जाकर लड़ें, भारत को बाधित न करें। उनके बयान ने राजनीतिक बहस और भाषा पर आलोचना को जन्म दिया।