शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
2
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
3
IndiGo Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
4
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
5
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
6
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
7
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
8
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
9
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
10
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
11
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
12
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
13
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
14
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
15
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
16
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
17
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
19
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
20
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?

उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 06:33 IST

विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :   प्रजासत्ताकदिनी सायंकाळी भाजप खासदार प्रवेश सिंह वर्मा यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाट समुदायाच्या नेत्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यामुळे  हा समुदाय भाजपला पुन्हा पाठिंबा देईल का? २०१७ च्या निवडणुकीआधीही अमित शहा हे जाट समुदायाच्या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले होते. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या. 

त्यावेळी २०१२ मधील दंगलीमुळे  जाट आणि मुुस्लिम समुदायांदरम्यान दरी पडली होती. तीन कृषी कायदेही मंजूर करण्यात आलेले नव्हते.  कृषी कायद्याला विरोध करणारे राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यासह हजारो शेतकऱ्यांवर लाठीमारही करण्यात आलेला नव्हता.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणाऱ्या जाट समुदायाच्या नेत्यांत  भाजपचे कार्यकर्ते होते. केंद्रीय मंत्री संजीव बालियान आणि खासदार प्रवेश वर्मा यांच्याव्यतिरिक्त भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस कृष्णपाल सिंह, डाॅ. अतुल तेवतिया, अतुल चौधरी, मनोज चौधरी, भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सोमपाल चौधरी, रवींद्र राजौरा यांच्यासह जवळपास १५० कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. 

समाजवादी पार्टी-रालोदवरही नाराजीकिसान शक्ती संघाचे प्रमुख आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समुदायाचे नेते चौधरी पुष्पेंद्र सिंह यांचे असे मत आहे की, ३० ते ४० टक्के जाट समुदाय आजही भाजपच्या बाजूने आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे जयंत चौधरी आणि अखिलेश यादव यांची निष्क्रियता होय. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२