शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

UP Investors summit: संपूर्ण जग ज्या गोष्टीच्या शोधात, ती ताकद फक्त भारताकडे; जाणून घ्या, इन्व्हेस्टर्स समिटमध्ये काय म्हणाले PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:28 IST

PM Modi at UP Investors Summit 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे तिसऱ्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनीमध्ये राज्यात 80,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या 1,406 प्रकल्पांचा शुभारंभ केला.

आज संपूर्ण जग एका विश्वासू सहकाऱ्याच्या शोधात आहे आणि ते पूर्ण करण्याची ताकद केवळ भारताकडेच आहे. भारताच्या क्षमतेकडे जगाचे लक्ष आहे. संपूर्ण जग भारताच्या कामगिरीची प्रशंसा करताना दिसत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटेले आहे. ते तिसऱ्या यूपी इन्व्हेस्टर्स समिटच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

तुमचे संकल्प पूर्ण होतील - मोदी म्हणाले, 'मी उत्तर प्रदेशातील काशीचा खासदार या नात्याने सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करतो. गुंतवणूकदारांनीउत्तर प्रदेशातील युवा शक्तीवर विश्वास दाखवला, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. उत्तर प्रदेशातील युवा शक्तीमध्ये असे सामर्थ आहे, ज्यामुळे आपल्या स्वप्नांना आणि संकल्पांना नवी भरारी मिळू शकेल. आपण जे स्वप्न घेऊन येथे आला आहात, राज्यातील तरुणांचे परिश्रम, त्यांचे सार्मथ्य आणि त्यांचे समर्पण, आपले हे स्वप्न आणि आपला संकल्प नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास मी आपल्याला देतो.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे तिसऱ्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनीमध्ये राज्यात 80,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या 1,406 प्रकल्पांचा शुभारंभ केला.

मोदी म्हणाले, 'आज जागतिक पातळीवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती आपल्यासाठी एक मोठी संधी आहे. आज जग ज्या विश्‍वासार्ह सहकाऱ्याच्या शोधात आहे, ते पूर्ण करण्याची ताकद केवळ आपल्या लोकशाही असलेल्या भारताकडेच आहे. भारताच्या क्षमतेकडे जगाचे लक्ष आहे. संपूर्ण जग भारताच्या कामगिरीची प्रशंसा करत आहे. एवढेच नाही, तर अगदी कोरोना काळातही भारत थांबला नाही, त्याने आपल्या सुधारणांना गती दिली. याचा परिणाम आज आपण सर्व जण पाहत आहोत, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशInvestmentगुंतवणूकEmployeeकर्मचारीVaranasiवाराणसी