शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

UP Election 2022: भाजपा-सपामध्ये थेट लढत, उत्तर प्रदेशात सत्तांतर होणार की, योगी सत्ता राखणार? महापोलमधून समोर आला असा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 19:29 IST

UP Election 2022 Update: समोर येत असलेल्या माहितीमधून उत्तर प्रदेशात BJP आणि Samajwadi Partyमध्ये थेट लढत होत असल्याचे दिसत आहे. तर विविध ओपिनियन पोल्समधून भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची लढाई ही रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. दरम्यान, समोर येत असलेल्या माहितीमधून उत्तर प्रदेशात भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये थेट लढत होत असल्याचे दिसत आहे. तर विविध ओपिनियन पोल्समधून भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यंत ७ प्रमुख वृत्तवाहिन्यांचे ओपिनयन पोल्स समोर आले असून, आता हे ओपिनियन पोल्स एकत्रित करत न्यूज १८ इंडियाने महापोल समोर आणला असून, त्यामधून उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या लढाईचं चित्र अधिक स्पष्ट झालं आहे. या महापोलमधून नेमका काय कल समोर आला आहे, तो पुढीलप्रमाणे आहे.

एबीपी-सी वोटर एबीपी-सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला २२३ ते २३५ जागा मिळतील. तर सपा आघाडीला १४५ ते १५७ जागा मिळतील. बसपाला ८ ते १६ आणि काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळतील.  इंडिया टीव्हीइंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला २३० ते २३५ जागा मिळतील. सपा आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील. बसपाला २ ते ५ जागा मिळतील. तर काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळतील. रिपब्लिक टीव्ही-पी मार्क रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला २५२ ते २७२ जागा मिळतील. तर सपाला १११ ते १३१ जागांवर विजय मिळू शकतो. बसपाला ८ ते १६ जागा आणि काँग्रेसला ३ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. न्यूज एक्स-पोल स्टार्ट न्यूज एक्स पोल स्टार्टने केलेल्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला २३५ ते २४५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा आघाडीला १२० ते १३० जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाच्या खात्यामध्ये १३ ते १६ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ४ ते ५ जागा मिळू शकतात. टाइम्स नाऊ-वीटो टाइम्स नाऊ-वीटोच्या ओपिनियन पोलनुसारा भाजपाला २२७ ते २५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपाला १३६ ते १५१ जागा मिळू शकतात. बसपाचा विचार केला तर बसपाला ८ ते १४ आणि काँग्रेसला ६ ते ११ जागा मिळू शकतात. झी-डिझाइन बॉक्स झी डिझाइन बॉक्सच्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला यूपीमध्ये २४५ ते २६७ जागा मिळू शकतात. तर सपाला १२५ ते १४८ जागा मिळू शकतात. तर बसपाच्या खात्यामध्ये ५ ते ९ जागा जाऊ शकतात. काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळू शकतात.  इंडिया न्यूज-जन की बात इंडिया न्यूज जन की बात ने केलेल्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला २२६ ते २४६ जागा मिळू शकतात. तर सपाला १४४ ते १६० जागा मिळू शकतात. तर मायावतींच्या बसपाला ८ चे १२ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला शून्य ते १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज १८ चा महापोल काय सांगतोया सर्व ओपिनियन पोलचा आधार घेत तयार करण्यात आलेल्या महापोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला सरासरी २३५ ते २४९ जागा मिळण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीच्या आघाडीला १३७ ते १४७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बसपाला ७ ते १३ जागांवरच समाधान मानावे लागू शकते. तर काँग्रेसच्या खात्यामध्ये ३ ते ७ जागा जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमताचा आकडा २०२ आहे. त्यामुळे या महापोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा केवळ अंदाजच आहे. आता नेमका विजेता कोण ठरेल हे १० मार्च रोजी निकालांमधूनच समोर येणार आहे.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी