शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एटीएसच्या हाती मोठे यश; नेपाळमार्गे भारतात घुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 22:03 IST

एटीएसने दोन पाकिस्तानी आणि एका काश्मिरी दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे.

UP Crime: उत्तर प्रदेश एटीएसने भारतात घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना युपी एटीएसने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये 2 पाकिस्तानी आणि 1 काश्मिरी दहशतवादी असून, ते तिघही हिजबुल मुजाहिदीन आणि ISI शी संबंधित आहेत. विशेष म्हणजे, यूपी एटीएसला काही दिवसांपूर्वीच या घुसखोरीची गुप्त माहिती मिळाली होती.

एटीएसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, दोन पाकिस्तानी आणि एक काश्मिरी दहशतवादी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने नेपाळमार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत होते. या तिघांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणही घेतले असून, भारतात दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते. काही दिवसांपूर्वीच युपी एटीएसला ही माहिती मिळाली होती.

दोन पाकिस्तानी व्यक्ती नेपाळमार्गे भारतात येणार असल्याची माहिती गोरखपूर युनिटला देण्यात आली. यानंतर 3 एप्रिल रोजी एटीएसच्या गोरखपूर युनिटने नेपाळ भारत बॉर्डवरुन तीन आरोपींना अटक केली. मोहम्मद अल्ताफ भट, सय्यद गझनफर आणि नासिर अली अशी आरोपींची नावे आहेत. मोहम्मद अल्ताफ भट हा रावळपिंडी, पाकिस्तानचा रहिवासी आहे, सय्यद गझनफर हा इस्लामाबाद, पाकिस्तानचा रहिवासी आहे, तर नासिर अली हा जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरचा रहिवासी आहे.

आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध केलीतिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर एटीएसने त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 2 मोबाईल फोन, 2 मेमरी कार्ड, 3 पासपोर्ट, 7 डेबिट आणि क्रेडिट कार्ड, 3 आधार कार्ड, 2 विमान तिकिटे, पाकिस्तानी ड्रायव्हिंग लायसन्स, पाकिस्तानी राष्ट्रीय ओळखपत्र, परदेशी ओळखपत्र जप्त करण्यात आले. नेपाळ, बांगलादेश, भारत आणि अमेरिकेचे चलन जप्त करण्यात आले आहे. यूपी एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद अल्ताफ भट, सय्यद गझनफर आणि नासिर अली या तीन आरोपींचे फोटोही शेअर केले आहेत.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसPakistanपाकिस्तान