शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

उत्तर प्रदेशात 24 तासांत 10 चकमकी; 8 शहरांमध्ये कारवाई, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:21 IST

UP Crime: यूपी पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांविरोधात 'ऑपरेशन लंगडा' सुरू केले आहे.

UP Crime:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील पोलिसांना गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी फ्री हँड दिलेला आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यातील गुन्हेगारी बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. विशेष म्हणजे, योगी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कुख्यात गुन्हेगारांविरोधात एनकाउंटरच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 24 तासांत पोलिसांनी 10 एन्काउंटर केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?उत्तर प्रदेशात गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांचे ऑपरेशन एन्काउंटर सुरू आहे. यूपी पोलिस राज्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसीवर काम करत आहेत. त्यामुळेच पोलिस एकामागोमाग एक एन्काउंटर करत आहेत. यूपी पोलिसांनी 24 तासांत राज्यातील 10 शहरांमध्ये एन्काउंटर केले. या एन्काउंटरमध्ये अनेक मोठे गुन्हेगार पकडले गेले. 

लखनऊमध्ये झालेल्या एन्काउंटरनंतर पोलिसांनी बलात्काराच्या आरोपीला अटक केली, तर एका कॉन्स्टेबलच्या हत्येच्या आरोपीला गाझियाबादमध्ये अटक करण्यात आली. याशिवाय 25 हजारांचे बक्षीस असलेला गुन्हेगार शामलीमध्ये पकडण्यात आला, तर झाशी, बुलंदशहर, बागपत, आग्रा, जालौन, बलिया आणि उन्नाव येथे झालेल्या चकमकींनंतर पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे.

लखनौ: बलात्काराच्या आरोपींचा एन्काऊंटरगाझियाबाद: खूनातील आरोपीच्या पायाला गोळीशामली: गाय तस्कराशी चकमकझांसी: वॉन्टेड गुन्हेगाराला गोळी लागलीबुलंदशहर: बलात्काराच्या आरोपीचा एन्काऊंटरबागपत: दरोड्यातील आरोपीला पोलिसांनी पकडलेबलिया: फरार गुन्हेगाराला गोळीआग्रा: चोरीच्या आरोपीचा एन्काऊंटरजालौन: दरोड्यातील आरोपीचा एन्काऊंटरउन्नाव: कुख्यात गुन्हेगाराशी चकमक

काय आहे ऑपरेशन लंगडा ?ऑपरेशन लंगडा ही उत्तर प्रदेश पोलिसांकडून गुन्हेगारांविरुद्ध चालवली जाणारी मोहीम आहे, ज्यामध्ये पोलिस गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी चकमकींदरम्यान गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान, जर गुन्हेगाराने पळून जाण्याचा किंवा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस त्याच्या पायात गोळ्या घालतात आणि त्यांना लंगडा बनवतात, जेणेकरून तो भविष्यात गुन्हे करू शकणार नाहीत. या रणनीतीला अनौपचारिकरित्या "ऑपरेशन लंगडा" असे म्हणतात. याचा उद्देश गुन्हेगारांना शारीरिकदृष्ट्या अक्षम करणे आहे जेणेकरून ते पोलिसांपासून घाबरतील. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस