CM Yogi Delhi Visit: दिल्लीत मोदी-योगी भेट! यूपीत सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर झालं मंथन, उपमुख्यमंत्री किती असणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 08:11 PM2022-03-13T20:11:18+5:302022-03-13T20:13:02+5:30

CM Yogi Delhi Visit: उत्तर प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यूपी जिंकल्यानंतर ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले आहेत.

Up cm yogi adityanath meet pm narendra modi in delhi over government formation | CM Yogi Delhi Visit: दिल्लीत मोदी-योगी भेट! यूपीत सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर झालं मंथन, उपमुख्यमंत्री किती असणार? 

CM Yogi Delhi Visit: दिल्लीत मोदी-योगी भेट! यूपीत सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर झालं मंथन, उपमुख्यमंत्री किती असणार? 

Next

CM Yogi Delhi Visit: उत्तर प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यूपी जिंकल्यानंतर ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांची भेट घेतली. मोदींची भेट घेण्याआधी योगी आदित्यनाथ यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष यांची भेट घेतली. यूपीमध्ये सरकार स्थापनेवर विचारमंथन करण्यासाठी योगी आज दिल्लीत पोहोचले आहेत. यूपीमधील मेगा विजयानंतर त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीत दोघांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचे समजते. यादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेसोबतच शपथविधीबाबतही चर्चा झाली. दुपारी एक वाजता योगी आदित्यनाथ यांनी संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दिल्लीत योगी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. बीएस संतोष यांच्यानंतर त्यांनी व्यंकय्या नायडू आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यानंतर ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचीही भेट घेतली. 

यूपीमध्ये सरकार स्थापनेवर चर्चा
यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपने 273 जागा जिंकल्या आहेत. यानंतर राज्यात नवे सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होळीनंतर शपथ घेऊ शकतात. याआधी ते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाशी सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. पीएम मोदींसोबत झालेल्या भेटीदरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री योगी यांनी यूपीमध्ये सरकार स्थापनेच्या सूत्रावर चर्चा केली. या भेटीत शपथविधीच्या तारखेबाबतही चर्चा होत आहे.

'निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन'
मुख्यमंत्री योगी यांच्या भेटीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. ट्विटमध्ये पंतप्रधानांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याचे लिहिले आहे. यासोबतच उत्तर प्रदेश निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदनही केले. गेल्या ५ वर्षात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या काही वर्षांत ते राज्याला विकासाच्या आणखी उंचीवर नेतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.

 

Web Title: Up cm yogi adityanath meet pm narendra modi in delhi over government formation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.