शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सामना जिंकला, पण जीव गमावला! मुरादाबादचा अनुभवी गोलंदाज मैदानावरच कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:39 IST

उत्तर प्रदेशात क्रिकेट खेळत असताना एका अनुभवी गोलंदाजाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

UP Accident: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये क्रिकेटच्या मैदानावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका गोलंदाजाने आपल्या संघाला शेवटच्या क्षणी रोमांचक विजय मिळवून दिल्यानंतर त्याला मृत्यूने गाठलं. विजयानंतर गोलंदाजाचा शेवटची ओव्हर पूर्ण करताच मैदानावर मृत्यू झाला. विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी संपूर्ण मैदानावर शोकाकूल वातावरण निर्माण झाले. सहा फूट उंची, हाय आर्म गोलंदाजी अहमर खान गोलंदाजी करताना फलंदाजाला चेंडू कुठून येतो हे कळायचे नाही. तरुणपणी अहमर खानने अनेक महान खेळाडूंना फसवून विकेट घेतल्या. पण ते रणजी खेळू शकला नाही हे दुर्दैवी होते. 

मुरादाबादच्या बिलारी ब्लॉकमधील शुगर मिल मैदानावर ही घटना घडली. यूपी वेटरन्स क्रिकेट असोसिएशनतर्फे रविवारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुरादाबाद आणि संभल या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. शेवटच्या षटकात संभल संघाला विजयासाठी १४ धावांची गरज होती. मुरादाबादकडून डावखुरे गोलंदाज अहमर खान हे संघासाठी निर्णायक शेवटचे षटक टाकण्यासाठी आले. त्यांनी अत्यंत नियंत्रित गोलंदाजी करत केवळ २ धावा दिल्या आणि आपल्या संघाला ११ धावांनी विजय मिळवून दिला.

मात्र, संघाला हा मोठा विजय मिळवून देताच, अहमर खान यांची तब्येत अचानक बिघडली. शेवटचा चेंडू टाकताच ते मैदानात जोरात कोसळले. मैदानावरील इतर खेळाडू आणि उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तात्काळ सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ ते प्रतिसाद देत असल्याचे वाटले, पण काही क्षणातच ते शांत झाले.

त्यानंतर तात्काळ अहमर खान यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अहमर खान हे अनुभवी गोलंदाज होते आणि एका औषध कंपनीत एमआर म्हणून काम करत होते.

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही मैदानावरच जीव गमावला आहे. अहमर खान  त्यांच्या निधनामुळे मुरादाबादच्या क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेसच्या मृत्यूने संपूर्ण जगाला धक्का बसला होता. फलंदाजी करताना त्याच्या हेल्मेटखाली एक बाउन्सर त्याच्या मानेवर लागला ज्यामुळे ब्रेन हॅमरेज झाले आणि तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. २००६ मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम राजा याचे क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावर निधन झाले होते. १९९८ मध्ये ढाका क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागून भारतीय क्रिकेटपटू रमन लांबाचांही मृत्यू झाला. ते शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत होते आणि त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Victory Turns Tragic: Cricketer Collapses, Dies on Field in Moradabad

Web Summary : Moradabad cricketer, Ahmar Khan, collapsed and died on the field after securing a victory for his team. The veteran bowler suffered a heart attack during the match organized by UP Veterans Cricket Association. His death casts a pall over the cricket community.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातHeart Attackहृदयविकाराचा झटका