शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
3
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
4
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
5
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
6
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
7
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
8
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
9
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
10
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
11
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
12
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
13
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
14
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
15
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
16
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
17
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
18
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
19
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"

UP Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशात निर्विवाद विजय मिळवणाऱ्या भाजपाला जबर धक्का, थेट उपमुख्यमंत्रीच पराभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:16 PM

UP Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशमधील सिराथू मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दिग्गज नेते केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव झाला आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने निर्विवाद विजय मिळवला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपाने २५० हून अधिक जागा जिंकल्या असून, मित्रपक्षांसह २७४ जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपाच्या या मोठ्या विजयाला गालबोल लागले आहे. उत्तर प्रदेशमधील सिराथू मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दिग्गज नेते केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव झाला आहे. 

सिराथू मतदारसंघातील लढत केशव प्रसाद मौर्य यांना जड जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. सपाकडून लढत असलेल्या अपना दलच्या नेत्या पल्लवी पटेल यांनी केशव प्रसार मौर्य यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. दरम्यान, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच पल्लवी पटेल ह्यांनी केशव प्रसाद मौर्य यांच्यावर माफक आघाडी घेतली होती. अनेक चढउतारानंतर त्यांनी ही आघाडी टिकवली आणि अखेरीस केशव प्रसाद मौर्य यांना ७ हजार ३३७ मतांनी पराभव पत्करावा लागला.

सिराथू मतदारसंघात केशव प्रसाद मौर्य पिछाडीवर पडल्यानंतर मतमोजणी केंद्रात तणाव निर्माण झाला होता. काही काळ मतमोजणी ही थांबवण्यात आली होती. दरम्यान, मतमोजणी संपल्यानंतर पल्लवी पटेल यांना  ७ हजार ३३७ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर केशव प्रसाद मौर्य यांनी आपला पराभव मान्य केला आहे. सिराथू मतदारसंघातील जनतेने दिलेला निर्णय मी स्वीकारत आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्यांचेय मी आभार मानतो. तसेच ज्यांनी मला मतदान केले त्यांच्याप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे ते म्हणाले. 

दरम्यान, आतापर्यंतच्या निकालांनुसार भाजपा आणि मित्रपक्ष २७४ मतदारसंघात आघाडीवर आहेत. तर सपा आणि मित्रपक्ष १२३ मतदारसंघात आघाडीवर आहेत. काँग्रेसला २ तर बसपाला १ जागा मिळाली आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाPoliticsराजकारण