UP Assembly Election 2022:"विजय निश्चित", मतदानाच्या एक दिवस आधी सीएम योगींचे ट्विट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 17:39 IST2022-02-09T17:39:11+5:302022-02-09T17:39:28+5:30
उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

UP Assembly Election 2022:"विजय निश्चित", मतदानाच्या एक दिवस आधी सीएम योगींचे ट्विट चर्चेत
कानपूर: उद्या होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा (PM Narendra Modi) एक फोटो ट्विट केला आहे. विजय निश्चित असल्याचे सीएम योगींनी फोटोसोबत लिहिले आहे. उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर उद्या मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात नोएडा, गाझियाबाद, शामली, मथुरा, अलीगढ, बागपत, मेरठ, हापूर, बुलंदशहर, मुझफ्फरनगर आणि आग्रा या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 58 पैकी 53 जागा जिंकल्या होत्या.
पीड़ित, शोषित, दुःखित बान्धवों के हमको हैं कष्ट मिटाने,
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 9, 2022
डटे हुए हैं राष्ट्रधर्म पर सीना ताने...
कदम निरंतर चलते जिनके,
श्रम जिनका अविराम है।
विजय सुनिश्चित होती उनकी,
घोषित यह परिणाम है॥ pic.twitter.com/GoOEjnfiwZ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीएम मोदींसोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. तसेच फोटोसोबत कॅप्शनमध्ये हिंदीतील एक कविता लिहिली की, ''पीड़ित, शोषित, दुःखित बान्धवों के हमको हैं कष्ट मिटाने, डटे हुए हैं राष्ट्रधर्म पर सीना ताने...कदम निरंतर चलते जिनके, श्रम जिनका अविराम है। विजय सुनिश्चित होती उनकी, घोषित यह परिणाम है॥''
यूपीमध्ये सात टप्प्यात मतदान
उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून, 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील 58 जागा, 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यासाठी 55 जागा, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यातील 59 जागा, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यातील 59 जागा, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यातील 61 जागा, 3 मार्चला सहाव्या टप्प्यातील 57 जागा आणि 7 मार्चला सातव्या टप्प्यातील 54 जागांसाठी मतदान होणार आहे.