शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

अखिलेश यादवांचा 'आघाडी फॉर्म्युला'; छोट्या पक्षांसोबत मैत्री किती यशस्वी होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:13 PM

UP Assembly Election 2022 : यंदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी समाजवागी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पुन्हा एकदा रालोदसह छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election 2022) राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, नेत्यांची पक्ष बदलण्याची मालिकाही सुरू आहे. 2022 च्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी समाजवागी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पुन्हा एकदा रालोदसह छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे.

अखिलेश यादव यांनी यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बसपा आणि 2017 मध्ये काँग्रेससोबत आघाडी केली होती. बसपा आणि काँग्रेस आघाडीला काही चमत्कार करता आला नाही. दोन्ही निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीला फारसा फायदा झाला नाही. यावेळी समाजवादी पार्टीने छोट्या पक्षांसोबत हातमिळवणी केली आहे.

यादरम्यान समाजवादी पार्टीचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांनी दावा केला आहे की. उत्तर प्रदेशच्या जनतेने ठरवले आहे की 2022 मध्ये समाजवादी पार्टीच्या आघाडीला प्रचंड बहुमताने जिंकून देईल आणि भाजपाचा पराभव करेल. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात लोकांनी ज्या प्रकारे आपल्या प्रियजनांना गमावले आहे, ते जनता विसरलेली नाही.

तसेच, भाजपावर निशाणा साधत अनुराग भदौरिया म्हणाले की, राज्यात महिलांची छेडछाड, शेतकऱ्यांची वाहने पायदळी तुडवली गेली, राज्यात खून, लूट, बलात्काराच्या घटना झपाट्याने वाढल्या. त्याचबरोबर महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ते म्हणाले की, 10 मार्च रोजी यूपीची जनता भाजपाला निरोप देईल.

अखिलेश यादव हे विश्वसनीय सहयोगी नाहीत - भाजपादुसरीकडे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले, "अखिलेश यादव हे विश्वसनीय सहयोगी नाहीत." 2017 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला होता, मात्र निवडणुकीनंतर हात मागे घेतला आणि 2019 मध्ये त्यांनी हत्तीला सहयोगी केले. बुवा-बबुआ युतीही निवडणुकीच्या काळातच तुटली. निवडणुकीपूर्वी युतीच्या गाठीही उघडताना दिसत असून अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमनेसामने उभे ठाकल्याचेही ते म्हणाले.

समाजवादी पार्टीला आघाडीचा मर्यादित फायदाराकेश त्रिपाठी पुढे म्हणाले की, जेव्हा अखिलेश यादव कुटुंबाला सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत. त्याचवेळी, त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी पार्टी सोडली, त्यामुळे अखिलेश विश्वासार्ह सहयोगी असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही. या प्रकरणी लखनऊचे ज्येष्ठ पत्रकार रत्न मणि लाल म्हणतात की, गेल्या काही निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीला लहान-मोठ्या पक्षांसोबत आघाडी करून फायदा झालेला नाही. मात्र, यावेळी समाजवादी पार्टीने केवळ जातीच्या आधारावर युती केली आहे, त्यामुळे त्याचा काही मर्यादित फायदा होऊ शकतो. दरम्यान, 10 मार्चला निकाल जाहीर झाल्यानंतर समाजवादी पार्टी आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

समाजवादी पार्टीसोबत कोण-कोणते पक्ष?2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अनेक पक्षांशी हातमिळवणी केली आहे. रालोद, सुभासपा, महान दल, प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया), राष्ट्रवादी काँग्रेस, जनवादी पक्ष (समाजवादी), अपना दल (कम्युनिस्ट) प्रमुख आहेत. या निवडणुकीत मागास जातीचे राजकारण करणाऱ्या पक्षांना सोबत घेण्यावर समाजवादी पार्टीचा भर आहे. हे त्यांच्या निवडणूक आघाडीतही दिसून येते. याशिवाय गेल्या आठवड्यात अनेक मंत्री आणि आमदारांनी भाजपा सोडून समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यात सर्वात मागास जातीचे नेते होते.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Samajwadi Partyसमाजवादी पार्टी