रेल्वेचे अनारक्षित तिकीट मिळेल आता दुकानावरही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:03 IST2018-06-09T02:03:58+5:302018-06-09T02:03:58+5:30
रेल्वेची आरक्षित नसलेली तिकिटेदेखील लवकरच प्रवाशांना त्यांच्या जवळचे दुकान किंवा रेल्वेशी संबंधित कोणत्याही संस्थेतून विकत घेता येतील.

रेल्वेचे अनारक्षित तिकीट मिळेल आता दुकानावरही
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : रेल्वेची आरक्षित नसलेली तिकिटेदेखील लवकरच प्रवाशांना त्यांच्या जवळचे दुकान किंवा रेल्वेशी संबंधित कोणत्याही संस्थेतून विकत घेता येतील. रेल्वे स्टेशनवर अनारक्षित रेल्वे तिकिटांसाठी रांगा संपवणे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी असा निर्णय घेतला जाणार आहे.
रेल्वेचा एक अधिकारी म्हणाला, यूटीएस अॅपने अनारक्षित तिकीट व प्लॅटफॉर्म तिकीट बुक होते. अनारक्षित तिकिटाला कोणत्याही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणत्याही वेळी का उपलब्ध करून देऊ नये? यामुळे लोक केव्हाही अनारक्षित तिकीट विकत घेऊ शकतील. चर्चेनंतर असे ठरले की संघटित रिटेल कंपन्या वा गैर सरकारी संस्था, सरकारी संस्थांच्या नेटवर्कला अशी सुविधा द्यावी की ज्यावर अनारक्षित तिकीट बुक होईल. यामुळे स्टेशनांवरील गर्दी कमी करता येईल.