शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
4
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
5
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
6
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
7
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
8
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
9
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
10
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
11
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
12
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
13
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
14
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
15
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
16
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
17
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
18
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
19
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
Daily Top 2Weekly Top 5

उन्नाव बलात्कार प्रकरण : सेंगरला तुरुंगातच ठेवा... हायकोर्टाच्या निर्णयालाच सुप्रीम कोर्टाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:37 IST

 निर्णयातील त्रुटी दाखवत जामिनालाही स्थगिती, सेंगरला नोटीस...

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी व भाजपचा निलंबित माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्या जामिनाला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सेंगर याला जामीन देऊ नये, अशी मागणी सीबीआयने न्यायालयाला केली. यानंतर न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयातील त्रुटी दर्शवत सेंगरचा जामीन स्थगित केला. तो आता तुरुंगात राहणार आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराशी संबंधित आयपीसी कलम ३७६(२)(आय) हे कलम दिल्ली उच्च न्यायालयाने तपासले नाही, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली. या प्रकरणाची सुनावणी आता चार आठवड्यांनी होणार आहे. न्यायालयाने सेंगर याला नोटीसही पाठवली आहे.गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयाने सेंगर याची कनिष्ठ न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून त्याला जामीन मंजूर केला होता. याविरोधात देशभर सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया निर्माण झाल्या होत्या. दिल्लीत अनेक महिला संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर निर्णयाविरोधात निदर्शनेही केली होती. या प्रकरणातील पीडित बलात्कारी महिलेच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

’फाशी होईपर्यंत लढा सुरू’ सेंगरच्या जामिनाला स्थगिती देण्याच्या  निर्णयावर पीडित महिलेने सेंगर याला फाशी होईपर्यंत माझा संघर्ष कायम राहील, अशी प्रतिक्रिया दिली. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी पूर्वीपासून न्यायासाठी आवाज उठवत आले आहे, असे ती म्हणाली. ‘राजकीय लाभाचा प्रयत्न’ दिल्ली हायकोर्टाविरोधात केल्या जात असलेल्या वक्तव्यावर पीठाने म्हटले की, काही लोकांचा यातून राजकीय फायदा व वैयक्तिक लाभाचा प्रयत्न सुरू आहे हे आम्हाला समजलेय. पण हे लोक विसरलेत की, सेंगरला न्यायालयानेच दोषी ठरवले आहे.

न्यायालय म्हणाले...सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जे. के. महेश्वरी आणि न्या. ए. जी. मसिह यांच्या पीठाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देताना म्हटले की, या प्रकरणामध्ये कायद्याचे महत्त्वपूर्ण प्रश्न गुंतलेले आहेत. साधारणपणे, जेव्हा एखाद्या दोषीला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामीन मिळतो, तेव्हा त्याचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय अशा आदेशाला स्थगिती दिली जात नाही.मात्र, या प्रकरणातील सेंगर हा आयपीसीच्या कलम ३०४ (भाग २) अंतर्गत अन्य एका प्रकरणात दोषी ठरलेला असून सध्या कोठडीत आहे. या वस्तुस्थितीचा विचार करता, न्यायालय या वादग्रस्त आदेशाला स्थगिती देत आहे. या आदेशाच्या आधारे त्याची कोठडीतून सुटका केली जाऊ नये.पीडितेचा स्वतंत्र याचिका दाखल करण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित आहे. तिला कायदेशीर मदतीची गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालय ती पुरवेल किंवा ती स्वतः अपील करू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Unnao Rape Case: Supreme Court stays bail of Sengar, keeps him in jail.

Web Summary : The Supreme Court stayed the bail granted to Kuldeep Singh Sengar, convicted in the Unnao rape case, after CBI opposed it. The court noted errors in the High Court's decision and ensured Sengar remains jailed. The victim expressed faith in the judiciary.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMLAआमदारCourtन्यायालय