शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Unnao Gangrape: 'भाजपा से बेटी बचाओ', सोशल मीडियावर काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 13:33 IST

काँग्रेस पार्टीनं भाजपाविरोधात सोशल मीडियावर मोहीम छेडली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरण आणि पीडित मुलीच्या वडिलांचा संशयास्पद झालेल्या मृत्यूबाबत काँग्रेस पार्टीनं सोशल मीडियावर योगी सरकारविरोधात #BhajpaSeBetiBachao या हॅश टॅग अंतर्गत अभियान छेडलं आहे. पीडित मुलीनं भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप केला आहे. या घटनेवरुन काँग्रेसनं भाजपावर हल्लाबोल चढवला आहे.  

ज्या भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे, योगी सरकार त्याला संरक्षण देत असल्याचा आरोप करत काँग्रेस पार्टीचे नेते व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर #BhajpaSeBetiBachao या अभियानांतर्गत भाजपाविरोधात मोहीम सुरू केली आहे. ''भाजपाचे आमदार, कार्यकर्ते आणि मंत्री स्वतःला कायद्यापेक्षा मोठे का मानतात ? हा एक मोठा प्रश्न असून भाजपाने त्याचे उत्तर द्यायला हवं'', हा मुद्दा काँग्रेस पार्टीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर उपस्थित केला आहे.  

नेमके काय आहे प्रकरण?एका 18 वर्षीय तरुणीनं भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. न्याय मिळावा यासाठी तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले. 

आयोगाची सरकारला नोटीसराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने उत्तर प्रदेश सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

भाजपा आमदाराच्या भावाला अटकयुवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंग व अतुलसिंग या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया