अन्यायग्रस्त शिक्षकांनी महासंघाशी संपर्क साधावा : आयरे
By Admin | Updated: May 9, 2014 18:32 IST2014-05-09T18:32:08+5:302014-05-09T18:32:08+5:30
कोल्हापूर : खासगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्यावर कोणत्याही कारणास्तव संस्थाचालक अथवा प्रशासकीय कार्यालयातील अधिकार्यंाकडून आर्थिक पिळवणूक किंवा दबाव येत असल्यास संबंधित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी लेखी स्वरूपात आपले म्हणणे महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाकडे त्वरित सादर करावे, असे आवाहन महासंघाचे शहराध्यक्ष संतोष आयरे यांनी केले.

अन्यायग्रस्त शिक्षकांनी महासंघाशी संपर्क साधावा : आयरे
क ल्हापूर : खासगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्यावर कोणत्याही कारणास्तव संस्थाचालक अथवा प्रशासकीय कार्यालयातील अधिकार्यंाकडून आर्थिक पिळवणूक किंवा दबाव येत असल्यास संबंधित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी लेखी स्वरूपात आपले म्हणणे महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाकडे त्वरित सादर करावे, असे आवाहन महासंघाचे शहराध्यक्ष संतोष आयरे यांनी केले.महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते. आयरे म्हणाले, संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पदोन्नती, वेतनश्रेणी, सेवानिवृत्ती वेतन या बाबतीतील अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांबाबत संस्थाचालक अथवा प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचार्यांच्याकडून आर्थिक पिळवणुकीबाबतच्या तक्रारी तोंडी सांगितल्या जातात. आपल्याला तक्रार केली तर त्रास होईल. या भीतीपोटी कर्मचारी आपल्यावर होणारा अन्याय मुकाट्याने सहन करतात. त्यामुळे हे कर्मचारी मानसिक तणावाखाली येऊन प्रसंगी जीवन संपविण्याचादेखील निर्णय घेतात तेव्हा अन्यायग्रस्त शिक्षकांनी कोणाच्याही दबावाखाली न येता निर्भिडपणाने आपल्यावर होणारा अन्याय संघटनेकडे लेखी स्वरूपात देऊन त्याची दाद मागितली, तर संघटना पातळीवर अन्यायग्रस्त शिक्षकांसाठी तीव्र आंदोलन छेडून संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्याला न्याय मिळवून दिला जाईल.या बैठकीस विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, राज्य शिक्षकेतर प्रमुख एम. डी. पाटील, सुधीर पोवार, स्नेहल रेळेकर, शीतल नलवडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)