आखातामध्ये सुमारे ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर अखेर आज अमेरिका आणि इराणमध्येयुद्धविरामाची घोषणा झाली आहे. या घोषणेनंतर आखातातील संघर्षामुळे वेठीस धरल्या गेलेल्या संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच जगातील विविध देशांकडून या युद्धविरामाचं स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, या युद्धविरामाबाबत आता भारताचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच भारताने या युद्धविरामाचं स्वागत करत पश्चिम आशियामध्ये आता कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त केली.
इराणमध्ये झालेल्या युद्धविरामाबाबत जगातील विविध देशांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आता याबाबत भारताची प्रतिक्रियाही समोर आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही या युद्धविरामाच्या निर्णयाचं स्वागत करतो. तसेच या युद्धविरामामुळे पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा संघर्ष लवकरात लवकर संपावा यासाठी तणाव कमी करणे, परस्परांमध्ये संवाद साधणे आणि मुत्सद्देगिरी आवश्य असल्याची भूमिका भारत सातत्याने मांडत आला आहे.
भारताने पुढे म्हटले आहे की, या संघर्षामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. तसेच जगभरातील इंधन पुरवठा आणि व्यापाराची साखळी विस्कळीत झाली आहे. आता या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जहाजांची विनाअडथळा वाहतूक सुरू राहील. तसेच जागतिक व्यापाराचा प्रवाहही सुरक्षित राहील, अशी अपेक्षाही भापताने व्यक्त केली आहे.
Web Summary : India welcomes the Iran-US ceasefire, expressing hope for lasting peace in West Asia. The Ministry of External Affairs emphasized dialogue and diplomacy. India expects unimpeded shipping through the Strait of Hormuz, ensuring smooth global trade.
Web Summary : भारत ने ईरान-अमेरिका के बीच युद्धविराम का स्वागत किया और पश्चिम एशिया में स्थायी शांति की उम्मीद जताई। विदेश मंत्रालय ने बातचीत और कूटनीति पर जोर दिया। भारत को होर्मुज जलडमरूमध्य से निर्बाध शिपिंग की उम्मीद है, जिससे वैश्विक व्यापार सुचारू रूप से चल सके।