शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

प्लाझ्मा थेरपी न वापरण्याचा अमेरिकेने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:38 IST

प्लाझ्माथेरपी किती उपयोगी ठरू शकते याबद्दल इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने एक पाहणी केली होती. मात्र, त्याचे निष्कर्ष अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.

नवी दिल्ली : कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी प्लाझ्माथेरपी फारशी प्रभावी ठरत नसल्याचे आढळल्यामुळे अमेरिकेने या उपचार पद्धतीचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचारांत प्लाझ्मा थेरपीला महत्त्व देणाऱ्या भारतासारख्या देशांची मोठी अडचण झाली आहे.प्लाझ्माथेरपीमुळे कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी खूप फायदा होतो हे अद्याप मानवी चाचण्यांतून सिद्ध झालेले नाही. त्यामुळेही अमेरिकेने ही उपचार पद्धती कोरोना रुग्णांसाठी यापुढे वापरायची नाही, असे ठरविले आहे. भारतामध्ये कोरोनाची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी प्लाझ्माथेरपी खूप महत्त्वाची मानली गेल्याने महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा या तीन राज्यांनी प्लाझ्मा बँकादेखील सुरू केल्या आहेत.प्लाझ्माथेरपी किती उपयोगी ठरू शकते याबद्दल इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने एक पाहणी केली होती. मात्र, त्याचे निष्कर्ष अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.यासंदर्भात एका संसर्गजन्य रोगतज्ज्ञाने सांगितले की, प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांवर उपचार करताना प्रभावी ठरत नसेल तर आयसीएमआरने तसे जाहीर करावे व ही उपचार पद्धती कोरोना रुग्णांसाठी न वापरण्याचा निर्णय घ्यावा. या थेरपीच्या उपयोगितेबद्दल आयसीएमआरने एप्रिलमध्ये चाचण्यांना प्रारंभ केला. त्याद्वारे ४५० कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले.या प्रयोगालाही आता तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. आयसीएमआरने या चाचण्यांचे निष्कर्ष आता तरी जाहीर करावेत, अशी मागणी संसर्गजन्य रोगतज्ज्ञ करीत आहेत.>खासगी रुग्णालयांनी घेतला गैरफायदाप्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरते की नाही याबद्दल संदिग्धता असल्याचा फायदा खासगीरुग्णालयांनी घेतला आहे.कोरोना रुग्णांना प्लाझ्माथेरपी हा रामबाण उपाय असल्याचे भासवत त्या उपचारांपोटी रुग्णांकडून खासगी रुग्णालये वारेमाप पैसे उकळत असल्याच्या घटना घडत आहेत.त्याला आयसीएमआर, केंद्र सरकारने पायबंद घालावा, अशी मागणी काही संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या