कॉलेज विद्यार्थ्याचं प्राध्यापकांना अनोखं गिफ्ट
By Admin | Updated: April 7, 2016 13:19 IST2016-04-07T13:19:21+5:302016-04-07T13:19:21+5:30
विद्यार्थ्यानं निवृत्त होणा-या प्राध्यापकांना चक्क कबर म्हणून भेट दिली

कॉलेज विद्यार्थ्याचं प्राध्यापकांना अनोखं गिफ्ट
ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. ६- केरळमधल्या एका सरकारी कॉलेजच्या विद्यार्थ्यानं निवृत्त होणा-या प्राध्यापकांना चक्क कबर म्हणून भेट दिली आहे. डाव्या विचारसरणीच्या या विद्यार्थ्यानं कबर भेट देऊन प्राध्यापकांचा अपमान केल्याची आता चर्चा आहे.
केरळातल्या पल्लकडमधल्या व्हिक्टोरिया कॉलेमधल्या एसएफआयच्या विद्यार्थ्यानं हा प्रकार केला आहे. 31 मार्च 2016 रोजी डॉ. टी. एन. सरसू या महिला प्राध्यापक कॉलेजमधून सेवानिवृत्त झाला होत्या. या महिला प्राध्यापकांना या विद्यार्थ्यानं सांकेतिक कबर भेटवस्तू म्हणून दिली होती.
या प्रकारानंतर प्राध्यापकांनी या विद्यार्थ्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी या विद्यार्थ्याविरोधात अनेक कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.