शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

हत्येचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 11:40 IST

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा मुलगा प्रबल पटेल आणि पुतण्या मोनू पटेल याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की, ही घटना दुख:द आणि दुर्दैवी आहे. कायदा आपला काम करेल. मला या प्रकरणावर कोणतंही भाष्य करण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा मुलगा प्रबल पटेल आणि पुतण्या मोनू पटेल याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्रबल पटेलला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे दोन गटांमध्ये काही कारणास्तव मारहाणीची घटना घडली होती. या घटनेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलाविरोधात दहशत पसरविणे आणि हत्येचा प्रयत्न करणे असा आरोप लावण्यात आला आहे. प्रल्हाद पटेल यांच्यावर केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. 

मध्य प्रदेशातील भोपाळपासून 25 किमी लांब नरसिंहपूरच्या गोटेगाव येथे दोन गटांमध्ये मारहाण झाली होती. या मारहाणीत एका बाजून गोळीबारीही करण्यात आली. यामध्ये एक जण जखमी झाला. त्याच्यावर जबलपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नरसिंहपूर एसपी गुरकरम सिंह यांनी या घटनेत प्रबल पटेलसह 7 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी 4 शोध पथके तयार केली आहेत. 

तक्रारकर्ते हिमांशू राठौर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केली. त्या तक्रारीत सांगण्यात आलं आहे की, तो आपल्या मित्रांसोबत एका लग्नावरुन परतताना वाटेमध्ये प्रबल पटेल आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्यावर हल्ला केला तसेच गोळीबार केला. या मारहाणीत दोन्ही गटाचे 7 जण जखमी झाले.  या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

टॅग्स :ministerमंत्रीCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस