शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

'पद्मावती' वादाप्रकरणी मी शांत बसू शकत नाही, वादात केंद्रीय मंत्री उमा भारतींची उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 13:03 IST

संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा 'पद्मावती' रिलीजपूर्वीच वादाच्या भोव-यात अडकला आहे. या सिनेमामागील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.

नवी दिल्ली -  संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा 'पद्मावती' रिलीजपूर्वीच वादाच्या भोव-यात अडकला आहे. या सिनेमामागील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शुटींगपासूनच संजय लीला भन्साळी यांच्या या महत्त्वाकांक्षी अशा या सिनेमाला विरोध होत आहे. दरम्यान, आता या वादात केंद्रीय मंत्री उभा भारती यांनीही उडी घेतली आहे. ज्या मुद्यांवरुन या सिनेमाला विरोध केला जात आहे ते पाहता उमा भारती यांनी म्हटलं आहे की, ''याप्रकरणात मी कोणत्याही प्रकारे तटस्थ राहू शकत नाही''.  

ऐतिहासिक बाबींमध्ये छेडछाड केल्याचा आक्षेप घेत श्रीराजपूत करणी सेनेनं सिनेमाला विरोध दर्शवला आहे. त्यांचे असे म्हणणं आहे की, सिनेमामध्ये महाराणी पद्मिनीला अलाउद्दीनच्या प्रेयसीच्या भूमिकेत दाखवण्यात येणार आहे. मात्र चित्तोडगडच्या इतिहासासंदर्भात लिहिण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये महाराणी पद्मिनी कधीही अलाउद्दीन खिलजीला भेटल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.या मुद्यावरुन उमा भारती यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. राणी पद्मावती यांच्याविषयी सुरू असलेल्या वादाप्रकरणी मी शांत बसू शकत नाही. पद्मावती यांना राजपूत समाजासोबत न जोडता, भारतीय नारीच्या अस्मितेशी जोडण्यात यावं, असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी इतिहासकार, सिनेनिर्माते आणि आक्षेप घेणारा समाजाचे प्रतिनिधी आणि सेंसर बोर्ड मिळून समिती बनवावी आणि यावर निर्णय घ्यावा, असेदेखील  उमा भारती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

दरम्यान, पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी तो राजपूत प्रतिनिधिंना दाखविला जावा, अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोग आणि गुजरात मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. राजपूत प्रतिनिधींना सिनेमा दाखविला तर सिनेमावरील त्यांचा रोष कमी होईल तसंच आगामी गुजरात निवडणुकांच्यावेळी कुठलीही तणावपूर्ण परिस्थिती उद्भवणार नाही, असं गुजरात भाजपाने पत्रात म्हटले आहे.  पद्मावती सिनेमा गुजरात निवडणुकीनंतर गुजरातमध्ये प्रदर्शित करा किंवा सिनेमाला बॅन करा, असं मत भाजपाचे प्रवक्ते आणि राजपूर नेता आय.के जडेजा यांनी केली आहे. क्षत्रिय, राजपूत प्रतिनिधींनी मला भेटून सिनेमात कुठल्याही प्रकारे इतिहास आणि राणी पद्मावतीच्या चारित्र्याविषयी छेडछाड करणाऱ्या मुद्द्यांना विरोध केला आहे. इतिहासानुसार राणी पद्मावती कधीही अलाऊद्दीन खिलजीला भेटली नव्हती, असं राजपूत प्रतिनिधींनी सांगितल्याचं आय.के.जडेजा यांनी म्हटले. गुजरातच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच सिनेमात दाखविण्यात आलेलं कथानक हे तथ्याला धरून असावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडाछाड नसावी ज्यामुळे राजपूत, क्षत्रिय समुदायाच्या भावना दुखावल्या जातील. 

टॅग्स :Padmavatiपद्मावतीBJPभाजपाDeepika Padukoneदीपिका पादुकोण