शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

"मी विशेषत: कॉंग्रेसचे आभार मानते, कारण...", विरोधकांच्या बैठकीवरून स्मृती इराणींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:17 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक होत आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी कॉंग्रेससह देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजुट दाखवली आहे. आज १५ विरोधी पक्ष एकत्र येत बिहारची राजधानी पाटणा येते बैठक घेत आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरातील विरोधी पक्षांच्या भेटी घेतल्या. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे कळते. यावरूनच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.

दरम्यान, विरोधकांच्या बैठकीला कॉंग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा आदी नेते उपस्थित आहेत. 

 विरोधकांच्या बैठकीवर भाष्य करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसची खिल्ली उडवली. "मी विशेषत: काँग्रेसचे आभार मानते. कारण ते एकटे पंतप्रधान मोदींना पराभूत करू शकत नाहीत आणि त्यासाठी त्यांना इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे हे जाहीरपणे दाखवून दिले आहे", अशी टीका इराणींनी केली.

विरोधी पक्षातील दिग्गजांची हजेरी या बैठकीला काँग्रेसच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला, पीडीपी सुप्रीमो मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे. सीताराम येचुरी आणि डी राजा यांसारखे अनेक डावे नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी