शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नुसती मेहनत नको, माल्ल्यासारखे स्मार्ट बना; मोदींच्या मंत्र्याचा तरुणांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 12:54 IST

हैदराबाद येथील पहिल्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती उद्योजक संमेलनाला संबोधित करताना त्यांनी फरार झालेल्या माल्ल्याचे उदाहरण दिले

हैदराबाद: भारताला कोट्यावधीचा चुना लावून फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवत प्रेरणा घेण्याचा अजब सल्ला केंद्रीय आदिवासी विकास मंत्री आणि भाजपाचे नेते जुएल ओराम यांनी आदिवासी समाजातील तरुणांना दिला होता. नुसती मेहनत करू नका, मल्ल्यासारखे स्मार्ट बना असा सल्ला ओराम यांनी दिला होता. त्यांच्या या अजब सल्ल्याची चर्चा रंगल्यानंतर ओराम यांनी आता सारवासारव करत मी चुकून विजय माल्ल्याचं नाव घेतलं. मी त्याचं नाव घ्यायला नको होतं माझी चूक झाली असं म्हटलं आहे. 

हैदराबाद येथील पहिल्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती उद्योजक संमेलनाला संबोधित करताना त्यांनी फरार झालेल्या माल्ल्याचे एक उदाहरण दिले. ‘माल्ल्याने कितीही वाईट कामे केलेली असली, तरी त्या आधी तो एक यशस्वी व्यावसायिक होता. त्याच्या या यशापासून प्रेरणा घेण्यासारखी आहे. विजय माल्ल्या हा एक कुशल आणि स्मार्ट माणूस आहे. त्याने आपल्याकडे बुद्धिमान माणसांना कामावर ठेवलं आणि नंतर बँका, सरकार आणि राजकारण्यांवर आपला प्रभाव पाडला. तुम्हाला हे सगळं करण्यापासून कोणी रोखलं आहे?’ असं ओराम म्हणाले. 

ओराम यांनी आदिवासींना सल्ला देताना आदिवासी असल्याचे काही फायदेही सांगितले.  शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात आदिवासींना आरक्षणाची सोय आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी चांगली कामगिरी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र काही वेळानंतर आपण घातलेला घोळ त्यांच्या लक्षात आला आणि या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. 

टॅग्स :BJPभाजपाVijay Mallyaविजय मल्ल्या