CAA: भारतात राहण्यासाठी 'भारत माता की जय' बोलावेच लागेल: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 10:32 AM2019-12-29T10:32:57+5:302019-12-29T10:36:44+5:30

सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांच्या बलिदान असे विसरून चालणार नाही.

union minister dharmendra pradhan statement regarding caa | CAA: भारतात राहण्यासाठी 'भारत माता की जय' बोलावेच लागेल: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं वक्तव्य

CAA: भारतात राहण्यासाठी 'भारत माता की जय' बोलावेच लागेल: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं वक्तव्य

Next

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात वातावरण तापले असून ठीक-ठिकाणी या काद्याद्याच्या विरोधात आंदोलने केली जात आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काद्याद्याला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना केलेल्या विधानामुळे वाद  निर्माण होण्याची शक्यता आहे. 'भारत माता की जय' बोलतील, तेच भारतात राहतील' असं वक्तव धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना उपस्थितांसमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, तुम्हाला भारताची धर्मशाळा बनवयाची आहे का? ज्या ठिकाणी कुणालाही कुठेही राहता आणि फिरता आले पाहिजे. त्यामुळे आम्हाला हे आव्हान स्वीकारावं लागणार आणि  निश्चित करावे लागणार  की, भारतात केवळ तेच लोक राहू शकतात जे 'भारत माता की जय' बोलण्यास तयार आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शहीद भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांच्या बलिदान असे विसरून चालणार नाही. त्यामुळे या सर्वांना आठवून आपल्याला एक निर्णय घेतला पाहिजे की, देशात राहणाऱ्या व्यक्तीला 'भारत माता की जय' म्हणावेच लागेल. असेही यावेळी धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

 

Web Title: union minister dharmendra pradhan statement regarding caa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.