राज्यात १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:18 AM2020-08-13T03:18:56+5:302020-08-13T06:48:44+5:30

उत्कृष्ट तपासकार्याचा गौरव; देशातील १२१ पोलीस अधिकारी मानकरी

Union Home Minister Medal announced for 10 police officers in the state | राज्यात १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

राज्यात १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

Next

दिल्ली : उत्कृष्ट तपास केल्याबद्दल यंदा देशातील १२१ पोलीस अधिकारी केंद्रीय गृहमंत्री पदकाचे मानकरी ठरले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या दहा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या पदकांची घोषणा करण्यात आली.

या पोलीस अधिकाºयांमध्ये सीबीआयचे १५ जण, मध्यप्रदेश व महाराष्ट्राचे प्रत्येकी दहा पोलीस अधिकारी, उत्तर प्रदेशमधील आठ, केरळ व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ७ पोलीस अधिकारी आहेत. बाकी पोलीस अधिकारी अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील आहेत. गृहमंत्री पदक जाहीर झालेल्यांमध्ये २१ महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री पदक ९६ पोलीस अधिकाºयांना जाहीर झाले होते. त्यामध्ये १३ महिला पोलीस अधिकाºयांचा समावेश होता. गुन्ह्यांचा तपास तत्परतेने व अतिशय कौशल्याने केला जावा व उत्कृष्ट तपास करणाºया अधिकाºयांना गौरविण्यात यावे, या उद्देशाने २०१८ सालापासून केंद्रीय गृहमंत्री
पदक देण्यास प्रारंभ झाला. त्यावर्षी १०१ पोलीस अधिकाºयांना या पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

यंदाचे महाराष्ट्रातील दहा मानकरी
(१) सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, (२) पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकाडे, (३) पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे, (४) वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, (५) पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, (६) पोलीस उपअधीक्षक अनिल घेर्डीकर, (७) पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, (८) सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, (९) सहायक पोलीस आयुक्त किसान गवळी, (१०) पोलीस निरीक्षक कोंडिराम पोपरे.

Web Title: Union Home Minister Medal announced for 10 police officers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस